उन्हाळ्याच्या दिवसात गाडी पार्किंग केली असताना चुकूनही फोन आत ठेवू नका. कारण यामुळे स्मार्टफोन जास्त गरम होण्याची शक्यता असते. अॅपल कंपनीच्या म्हणण्यानुसार, आयफोन 35 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानात ठेवल्यास बॅटरी खराब होऊ शकते.
गाडी चालवत असताना फोन डॅशबोर्डवर ठेवू नका. कारण गाडी चालवताना तुमचं लक्ष फोनकडे नसतं. त्यामुळे समोरच्या काचेतून पडणारी अति उष्ण किरणं थेट मोबाईलवर पडतात. यामुळे फोन गरम होऊ शकतो.
शक्यतो घरात जिकडे पुरेसा सूर्यप्रकाश पडतो अशा ठिकाणी स्मार्टफोन ठेवू नका. कारण चार्जिंग करताना तो अधिक गरम होऊ शकतो. फोन चार्जिंगला कायम सावली असलेल्या ठिकाणी ठेवावा.
उन्हाळ्यात बाहेर फिरताना शक्यतो फोनवर बोलणं टाळा. कारण अशावेळी फोन क्षमतेपेक्षा जास्त तापू शकतो. जर तुम्हाला फोन गरम वाटत असेल तर थोडा वेळ बाजूला ठेवा. फोन थंड झाल्यावर पुन्हा वापरा.
फोन गरम होण्याचं दुसरं कारण म्हणजे अधिक काळ चार्ज करणे. रात्री फोन चार्जिंगला लावून झोपू नका. यामुळे फोन गरम होतो तसेच बॅटरी फुगते. सध्याच्या स्मार्टफोनमध्ये ऑटो कट ऑफ आहेत. पण फोन चार्ज करताना उशी किंवा ब्लँकेटखाली ठेवू नका.
फोन जास्त गरम झालं असं वाटलं तर पहिल्यांदा फोनचं कव्हर काढा. कारण यामुळे फोन अधिक तापून फुटूही शकतो. त्यामुळे फोन बाहेर काढून ठेवणं कधीही चांगलंच ठरेल.