किती श्रीमंत आहेत डोनाल्ड ट्रम्प? यात गुंतवलाय सर्वाधिक पैसा

| Updated on: Jul 14, 2024 | 3:14 PM

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि सर्वांत मोठे उद्योगपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार झाला. त्यांच्या कानाला एक गोळी स्पर्श करून गेली. सध्या त्यांची प्रकृती ठीक आहे. जगातील 500 श्रीमंतांच्या यादीत ट्रम्प यांचं नाव समाविष्ट आहे.

1 / 5
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि येत्या नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर एका रॅलीदरम्यान जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यात ते थोडक्यात बचावले.

2 / 5
एका स्नायपरने ट्रम्प यांच्यावर गोळीबार केला. ती गोळी ट्रम्प यांच्या कानाला स्पर्श करून गेली. त्यांच्या कानाला थोडी दुखापत झाली असून ट्रम्प यांची प्रकृती ठीक आहे. त्यांच्यावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरालाही अटक करण्यात आली आहे.

3 / 5
अमेरिकेतीलच नाही तर जगातील श्रीमंतांच्या यादीत डोनाल्ड ट्रम्प यांचा समावेश आहे. ते एक यशस्वी उद्योगपतीही आहेत. 'ब्लूमबर्ग बिलिअनेअर्स इंडेक्स'च्या जगातील 500 श्रीमंतांच्या यादीत डोनाल्ड ट्रम्प यांचाही समावेश आहे. 2024 मध्ये ट्रम्प यांच्या एकूण संपत्तीत 4 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त वाढ झाली.

4 / 5
डोनाल्ड ट्रम्प यांची गणना अमेरिकेतील बड्या उद्योगपतींमध्ये केली जाते. ट्रम्प यांनी रिअल इस्टेटमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. 'फोर्ब्स'च्या अहवालानुसार, डोनाल्ड ट्रम्प यांची 2024 मध्ये एकूण संपत्ती 6.7 अब्ज डॉलर्स म्हणजेच तब्बल 5,59,57,96,45,000 रुपये इतकी आहे.

5 / 5
ट्रम्प यांचे अनेक व्यवसाय आहेत. मात्र त्यांच्या संपत्तीचा मोठा भाग ट्रम्प मीडिया अँड टेक्नॉलॉजी या सोशल मीडिया कंपनीमधील त्यांच्या शेअर्समधून येतो.