Marathi News Photo gallery Dubai Princess Who publicly divorced Husband In Insta Post Launches Perfume Line Called Divorce receives comments
सोशल मीडियावर पतीला ‘तलाक’ दिल्यानंतर दुबईच्या राजकुमारीकडून ‘या’ भन्नाट नावाचा परफ्युम लाँच
दुबईच्या राजकुमारीने जुलै महिन्यातसोशल मीडियावर पोस्ट लिहित पतीला जाहीरपणे घटस्फोट दिला होता. या घटस्फोटानंतर आता तिने एक परफ्युम लाँच केला आहे. या परफ्युमचं भन्नाट नाव वाचून नेटकरी त्यावर विविध प्रतिक्रिया देत आहेत.
1 / 5
काही महिन्यांपूर्वीच दुबईच्या राजकुमारीने थेट सोशल मीडियावर पोस्ट लिहित पतीला जाहीरपणे घटस्फोट दिला होता. दुबईच्या शासकाची कन्या शेख महरा बिंत मोहम्मद बिन रशीद अल मकतूम हिने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये 'तलाक तलाक तलाक' असं लिहिलं होतं.
2 / 5
पतीच्या विवाहबाह्य संबंधामुळे लग्नाच्या दहा महिन्यांतच तिने घटस्फोट दिला होता. त्यानंतर आता दुबईच्या राजकुमारीने तिच्या 'महरा एम 1' या ब्रँडअंतर्गत एक परफ्युम लाँच केला आहे. या परफ्युमचं नावच तिने 'Divorce' असं ठेवलंय. त्यामुळे सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा आहे.
3 / 5
'प्रिय पती, तुम्ही इतर सोबतीसह व्यस्त असल्याने मी आपला घटस्फोट जाहीर करते. तलाक, तलाक, तलाक.. काळजी घ्या, तुमची पूर्व पत्नी', असं तिने लिहिलं होतं. आता 'Divorce' या नावाचा परफॉर्म लाँच केल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
4 / 5
'हे 2024 आहे, आता घटस्फोटानंतर महिला रडत बसत नाहीत, तर थेट त्या नावाचा परफ्युम लाँच करतात', असं एकाने लिहिलं. तर 'यापेक्षा चांगला सूड असूच शकत नाही', असं दुसऱ्याने म्हटलंय. 'अत्यंत स्मार्ट निर्णय' अशा शब्दांत नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केलं आहे.
5 / 5
शेख महरा ही संयुक्त अरब अमिरातीचे उपाध्यक्ष, पंतप्रधान आणि दुबईच्या शासकांची मुलगी आहे. तिचा जन्म 26 फेब्रुवारी 1994 रोजी युएईमधील दुबईत झाला असून ती 30 वर्षांची आहे.