धरणातील पाण्याचा आधार : यंदा अधिकच्या पावसामुळे खरिपातील पिकांचे नुकसान झाले असले तरी या पावसाचा फायदा रब्बी हंगामात झाला आहे. धरणात सरासरीपेक्षा अधिकचे पाणी असल्याने पिकांना पाणी सोडण्याची परवानगी पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे.
नदीकाठच्या शेतकऱ्यांना फायदा :वडज धरणातून मीना नदीपात्रात उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले असून या आवर्तनाचा मीना आणि घोड नदीकाठच्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे त्यामुळे करपू लागलेल्या पिकांना आता जीवदान मिळणार आहे.
ऊन्हाच्या झळा: वाढत्या उन्हाचा परिणाम उन्हाळी हंगामातील पिकांवर होत आहे. यामुळे पिके सुकू लागली आहेत. शिवाय जलस्त्रोतांनी तळ गाठल्याने शेतकरी धास्तावले आहे. गेल्या तीन महिन्यापासून पिकांची जोपासणा करुन आता उत्पादनात घट होणार याची धास्ती शेतकऱ्यांना आहे.
यंदा प्रथमच उन्हाळी पिके बहरात : उन्हाळी पिके ही संपूर्ण साठलेल्या पाण्यावर अवलंबून असतात. दरवर्षी मार्च महिन्याच जलस्त्रोत हे तळ गाठतात. पण यंदा एप्रिलपर्यंत पाणी टिकून राहिले आहे. आता गरज निर्माण होताच धरणातील पाण्याचा शेतीमधील पिकांसाठी वापर केला जात आहे.