ओवा
ओव्यामध्ये लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, आयोडीन, कॅरोटीन असते. शिवाय यामध्ये फायबर, कार्बोहायड्रेट, प्रोटीन्सदेखील काही प्रमाणात आढळतात. ओव्यामधील थायमॉल या जंतूनाशक घटकांमुळे वातावरण शुद्ध होते. त्यामुळे ओव्याचा (Ajwain) नैसर्गिक औषध म्हणून देखील वापर केला जातो.
भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये अनेक पदार्थांमध्ये ओवा आवर्जून वापरला जातो. कारण त्यामुळे पदार्थ रुचकर होतात आणि पाचनही सुरळीत राहते.
पोटदुखी थांबवण्यासाठी उत्तम आहे ओवा - जर तुमच्या पोटात दुखत असेल तर ओवा तुमच्यासाठी रामबाण उपाय आहे. गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठता झाल्यास काळी मिठ मिसळून ओवा खावा.
दम्याच्या रूग्णांसाठी फायदेशीर - ओवा दम्याच्या आजारासाठी अतिशय प्रभावी औषध मानलं जातं. ज्या लोकांना दमा आहे त्यांना दररोज कमीतकमी एक चमचा ओवा खाणं चांगलं आहे.
संधिवातामुळे वेदना होत असल्यास, ओव्याची पुरचुंडी तयार करून त्या भागावर शेक द्या. अर्धा कप पाण्यात ओवा उकळवा आणि त्यात सुंठ मिसळून त्याचे सेवन करा. यामुळे संधिवातात खूप आराम मिळेल.
जर मायग्रेनमुळे वेदना होत असतील, तर ओव्याची पावडर एका पातळ कपड्यात बांधून तिचा सतत वास घेतल्याने वेदनेपासून आराम मिळेल.
ज्या महिलांना मासिक पाळी दरम्यान असह्य वेदना होत असेल, त्यांच्यासाठी ओवा ही एक अतिशय उपयुक्त वनस्पती आहे. अशावेळी ओवा पाण्यात उकळवा आणि तो प्या, किंवा कोमट पाण्यात एक चमचा ओवा घालून त्याचे सेवन करा.
ओवा मुरूमं दूर करण्यासाठी देखील प्रभावी आहे. यासाठी पाण्यात ओवा मिसळून पेस्ट बनवा आणि मुरुमांच्या जागी 10 ते 15 मिनिटे लावा. यामुळे त्वचेच्या आत अडकलेल्या धुळीपासून मुक्त होण्यास आणि मुरुमांपासून मुक्त होण्यास मदत होईल.