ब्लूबेरी एक फळ आहे. याची चव आंबट आणि गोड आहे. भारतात याला नीलबदरी म्हणूनही ओळखले जाते. हे आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे, हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
ब्लूबेरीमध्ये पॉलिफेनॉल असतात. यामुळे आपली हाडे मजबूत होण्यास मदत होते. हाडे मजबूत करण्यासाठी आपण आपल्या आहारात ब्लूबेरीचा समावेश करा
ब्लूबेरीमध्ये अँथोसॅनिन असते. हे वजन कमी करण्यास मदत करते. आपण वजन कमी करण्यासाठी देखील याचा वापर करू शकतो.
हृदय निरोगी ठेवण्यासाठी आपण आहारात ब्लूबेरीचा समावेश करू शकता. त्यात फायबर आणि अँटीऑक्सिडेंट असतात. ते खराब कोलेस्ट्रॉल देखील कमी करतात.
ब्लूबेरी