जिरे खाणे आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. जिरे खाल्याने अनेक आरोग्य समस्या या दूर होण्यास मदत होते. शिवाय जिरे खाल्याने वजनही कमी होण्यास मदत होते.
प्रत्येक व्यक्तीने विशेष: महिलांनी दररोज 5 ग्राम जिरे खाणे आवश्यक आहे. पचनतंत्र निरोगी ठेवण्यासाठी जिरे अत्यंत फायदेशीर आहेत.
विशेष म्हणजे जिरे खाल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होते. यामुळेच आपल्या दररोजच्या आहारात जिऱ्यांचा समावेश करा.
जिऱ्यामुळे मेटाबॉलिज्म वाढण्यास मदत होते आणि झटपट वजन कमी होण्यास मदत होते. दररोज सकाळी जिऱ्याचे पाणी पिणे अधिक फायदेशीर ठरते.
रात्री झोपताना जिरे भिजत घाला आणि ते पाणी सकाळी गरम करून प्या. यामुळे अनेक आरोग्य समस्या दूर होण्यास मदत होते.