Ekanath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आपत्ती व्यवस्थापनविषयक बैठक
या बैठकीसाठी राज्यातील जिल्ह्यधिकारी कार्यालय ऑनलाईन पद्धतीनं सहभागी झाली होती. मुंबईतील आणि राज्यातील परिस्थितीची या बैठकीत चर्चा केली जाईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बैठकीत पावसाचा आढावा घेतला
1 / 5
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची व देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात राज्यातील आपत्ती विषयक व्यवस्थापनाचा आढावा घेणारी बैठक सुरु
2 / 5
मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव तसेच विविध विभागांचे सचिव तसेच हवामान विभाग, रेल्वे, बेस्ट, पालिका, लष्कराच्या तीनही दलाचे अधिकारी, जेएनपीटी आदींची उपस्थिती.
3 / 5
मेट्रोचं बरेच काम झालं आहे. मात्र कारशेडचं काम झाल्याशिवाय मेट्रो सुरू होऊ शकत नाही. मागच्या सरकारने जागा बदलल्याने हे काम रखडलं आहे. आमच्या सरकारने सुरू केलेलं आरेतलं काम हे 25 टक्के पूर्ण झालं आहे. त्यामुळे मेट्रो लवकर सेवेत आणयची असेल तर मेट्रोचं कारशेड ही आरेमध्येच व्हावं, अशी आमची इच्छा आहे. मी उद्धव ठाकरे यांनाही इगो बाजुला ठेवण्याची विनंती केली, त्यांचा निर्णय हा चुकीचा होता, अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे.
4 / 5
या बैठकीसाठी राज्यातील जिल्ह्यधिकारी कार्यालय ऑनलाईन पद्धतीनं सहभागी झाली होती. मुंबईतील आणि राज्यातील परिस्थितीची या बैठकीत चर्चा केली जाईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बैठकीत पावसाचा आढावा घेतला
5 / 5
पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, कोल्हापूर येथे पुढील ३ दिवस मुसळधार पाऊस सुरुये. अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. तर हवामान विभागानेही मुंबईला ऑरेंज अलर्ट दिलाय. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक बोलावली आहे.