Marathi News Photo gallery Eknath Shinde banner in thane luiswadi catches everyones attention amid discussions of The name of the next Maharashtra Chief Minister
राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळूनही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा अद्याप जाहीर झालेला नाही. आता ठाण्यात लुईसवाडी इथल्या निवासस्थानी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने हा बॅनर लावण्यात आला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नावाने बॅनर
Image Credit source: Instagram
Follow us on
राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील लुईसवाडी निवासस्थानाबाहेर लावण्यात आलेल्या बॅनरने सर्वांचं लक्ष वेधलंय.
‘राहुल कनाल फाऊंडेशन’च्या वतीने हा बॅनर लावण्यात आला आहे. या बॅनरवर एकनाथ शिंदे यांचा फोटो आणि त्यासोबतच काही मजकूर लिहिलेला आहे.
‘भाई!!! लहानांसाठी शिंदे काका, बहिणीसाठी लाडका भाऊ, तरुणांसाठी लाडका दादा, ज्येष्ठांसाठी आधार, समाजाचा कॉमन मॅन हवाच आपल्या स्वरुपात!!!’, अशा आशयाचा हा बॅनर लावण्यात आला आहे.
राज्यात महायुतीकडे स्पष्ट बहुमत असूनही मुख्यमंत्रिपदासाठी कोणाचं नाव अद्याप जाहीर झालेलं नाही. शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडल्याचं जाहीर केलं असलं तरी गृहमंत्रिपदाबाबत ते नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत.
याचदरम्यान ठाण्यात लावलेला हा बॅनर शिंदेंच्या चाहत्यांमधील त्यांच्या नेतृत्वाविषयी असलेल्या अपेक्षांचं प्रतीक मानला जात असून या बॅनरची सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे.