Marathi News Photo gallery Els Enfarinats Festival Spain a war with eggs and flour know everything about 200 year old tradition
Els Enfarinats Festival Spain : ही कसली लढाई, ज्यात विरोधकांवर गोळ्या नाही, तर अंडी फेकली जातात! पाहा Photos
स्पेनमधल्या इबी शहरात 1856पासून दरवर्षी 28 डिसेंबर रोजी हा सण साजरा केला जातो. यात विरोधी पक्षाचे सदस्य पीठ आणि अंडी एकमेकांवर फेकतात. तुम्ही अशा युद्धाबद्दल ऐकलं असेल ज्यामध्ये दारूगोळा किंवा शस्त्रं वापरली जात नाहीत.
1 / 5
स्पेनमधल्या इबी शहरात 1856पासून दरवर्षी 28 डिसेंबर रोजी हा सण साजरा केला जातो. यात विरोधी पक्षाचे सदस्य पीठ आणि अंडी एकमेकांवर फेकतात. तुम्ही अशा युद्धाबद्दल ऐकलं असेल ज्यामध्ये दारूगोळा किंवा शस्त्रं वापरली जात नाहीत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, की याच्याशिवाय युद्ध काय असेल? पण आज आपण ज्या युद्धाबद्दल बोलत आहोत, त्यात अंडी फेकली जातात. लोक त्यांच्या प्रतिस्पर्ध्यावर पिठानं हल्ला करतात. खरंतर आम्ही स्पेनमध्ये साजऱ्या होणाऱ्या एल्स एनफॅरिनट्स उत्सवाविषयी बोलत आहोत. (फोटो : GCTN)
2 / 5
हा सण 1856पासून स्पेनच्या एलिकॅन्ट प्रांतातील इबी शहरात साजरा केला जातो. दरवर्षी 28 डिसेंबर रोजी एक सत्तापालट केली जाते ज्यामध्ये विरोधी पक्षाचे लोक पीठ आणि अंड्यांवर एकमेकांशी भांडतात. जर्मनी आणि इतर काही देशांमध्ये 1 एप्रिल रोजी विनोद, खोड्या, एकमेकांची चेष्टा करण्याची प्रथा आहे, त्याचप्रमाणे स्पेनमध्ये 28 डिसेंबर रोजी थट्टा केली जाते.
3 / 5
जर्मन वेबसाइट dw.comच्या रिपोर्टनुसार, हा सण त्या भयंकर दिवसाचे स्मरण करतो जेव्हा राजा हेरोडनं बेथलेहेममध्ये मुलांना मारण्याचा आदेश दिला होता. बायबलनुसार, हा आदेश या आशेनं देण्यात आला, की अशा प्रकारे येशू ख्रिस्ताला पकडलं जाऊ शकतं. (फोटो : न्यूयॉर्क टाइम्स)
4 / 5
या उत्सवाच्या दिवशी सत्तापालट होते. जुना लष्करी गणवेश घातलेल्यांचे चेहरे रंगानं रंगवले जातात. एक दिवसासाठी त्यांची सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न करतात. त्यापैकी एकाला महापौर बनवलं जातं, ते लोकांवर अनावश्यक कायदे लादतात. त्याचं पालन करण्याचही बंधन सर्वांवर असतं. (छायाचित्र : दैनिक स्टेटडार्ड)
5 / 5
अशा आदेशांचं पालन न करणाऱ्यांना शिक्षा, दंड आणि तुरुंगवासही भोगावा लागतो. पीठानं माखलेले लोक सकाळी 9 वाजता चर्चच्या चौकात जमतात आणि न्यायाची मागणी करतात. विरोधक असे कायदे मान्य करत नाहीत आणि या मुद्द्यावरून लढा सुरू होतो. विरोधक एकमेकांवर अंडी फेकण्यास सुरुवात करतात. संध्याकाळी, नृत्य-मस्ती आणि नंतर साफसफाई करून उत्सव संपतो. (फोटो : DW)