फडणवीसांचे ‘देवा भाऊ’ बॅनर झळकले; बॅनरवर पायाने टीळा लावणाऱ्या बहिणीचा फोटो
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. यानंतर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होत आहे.
नागपुरमधील नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस हे विजयी झाले आहेत. हा विजय साजरा करताना कार्यकर्त्यांनी फडणवीसांचे देवा भाऊ हे बॅनर झळकवले.
1 / 6
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर 23 नोव्हेंबर म्हणजे आज अखेर निकाल हाती आले आहेत. नागपुरमधील नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस हे विजयी झाले आहेत. हा विजय साजरा करताना कार्यकर्त्यांनी फडणवीसांचे देवा भाऊ हे बॅनर झळकवलेत.
2 / 6
देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसच्या प्रफुल्ल गुडधे यांचा मोठ्या मताधिक्क्याने पराभव केला आहे.कार्यकर्त्यांनी जल्लोष करत फडणवीसांचे बॅनर झळकवलेत.
3 / 6
फडणवीसांचे 'देवा भाऊ' अशा आशयाचे बॅनर आता कार्यकर्त्यांकडून झळकवताना दिसत आहेत. दरम्यान या बॅनरवर दिव्यांग मुलीनं फडणवीसांना पायानं टिळा लावलेला फोटोचे हे बॅनर असून त्यावर 'देवा भाऊ' असं लिहिण्यात आलं आहे.
4 / 6
फडणवीसांनी जळगाव दौऱ्यावर असताना दिव्यांग शाळेला भेट दिली होती त्यावेळेसचा हा क्षण होता. तर,
5 / 6
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचा प्रचाराचा एक भाग म्हणून 'देवा भाऊ' हे गाणं लॉन्च केलं होतं.
6 / 6
भाजपच्या कार्यकर्त्यांनी आता हे दोन्ही गोष्टींन एकत्र करत हा बॅनर बनवला असून तेच बॅनर झळकवत फडणवीसांचा विजय साजरा करत आहेत.