बाॅलिवूड अभिनेत्री आणि अनिल कपूर यांची लेक सोनम कपूर ही नेहमीच चर्चेत असते. सोनम कपूर ही गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूड चित्रपटांपासून दूर आहे.
सोनम कपूर ही सध्या मुलगा वायु याचे संगोपन करण्यात व्यस्त आहे. नेहमीच सोनम कपूर ही सोशल मीडियावर मुलगा वायु याच्यासोबतचे काही खास फोटो शेअर करताना दिसते.
सोनम कपूर हिने शेअर केलेले काही फोटो पाहून मोठी चर्चा काही दिवसांपूर्वीच रंगली होती. या फोटोमध्ये सोनम कपूर हिने नो मेकअप लूकमधील फोटो शेअर केले होते. मात्र, सोनम कपूर हिला पाहून अनेकांना धक्का बसला.
कारण सोनम कपूर हिने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिची त्वचा खूपच जास्त खराब दिसत आहे. इतकेच नाही तर डोळ्यांखाली डार्क सर्कल देखील दिसत आहेत.
सोनम कपूर हिने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या चेहऱ्यावर बरेच डाग देखील दिसत होते. या फोटोनंतर अनेकांनी सोनम कपूर हिला ट्रोल करण्यासही सुरूवात केली होती.