Sanjay Dutt | संजय दत्तच्या नावावर 72 कोटीची संपत्ती सोडून जाणारी निशा पाटील कोण?
Sanjay Dutt | संजय दत्त बॉलिवूडमधील यशस्वी तसेच वादग्रस्त अभिनेता आहे. त्याने करिअरमध्ये अनेक चढ-उतार अनुभवले. ड्रग्ज, तुरुंगवास अशा वेगवेगळ्या अनुभवांमधून संजय दत्तला जाव लागलं. संजय दत्त चुकला पण त्यातून तो काही गोष्टी शिकला.
1 / 10
29 जुलै 1959 रोजी जन्मलेल्या संजय दत्तच आयुष्य हे एखाद्या चित्रपटाच्या कथेसारख आहे. त्यात बरेच चढ-उतार आहेत. संजय दत्तने आयुष्यात यश पाहिलं तसच वाईट काळही अनुभवला.
2 / 10
म्हणूनच संजय दत्तच्या आयुष्यावर ‘संजू’ नावाचा चित्रपट आला. रणबीर कपूरने या चित्रपटात संजय दत्तचा रोल साकारलेला. बॉक्स ऑफिसवर सुद्धा हा चित्रपट यशस्वी ठरला.
3 / 10
1981 साली 'रॉकी' चित्रपटाद्वारे संजय दत्तच्या फिल्मी करीअरला सुरुवात झाली. आजही संजूबाबा चित्रपटांमध्ये हिरोचा रोल साकारतो. महत्त्वाच म्हणजे तो अजूनही यशस्वी आहे.
4 / 10
संजय दत्तने करीअरमध्ये 130 पेक्षा जास्त चित्रपटात अभिनय केलाय. 17 पेक्षा जास्त पुरस्कार मिळवलेत. 'खलनायक', 'मुन्ना भाई एमबीबीएस' हे प्रेक्षकांच्या लक्षात राहिलेले काही खास चित्रपट आहेत.
5 / 10
1992 सालच्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात त्याच्यावर आरोप झाले. त्याला तुरुंगवासही झाला. संजय दत्तने तुरंगवास भोगला. त्यानंतरही पडद्यावरील त्याची जादू कमी झाली नाही.
6 / 10
संजय दत्तवर वेगवेगळे आरोप झाले. मात्र, तरीही त्याला फॅन्सच प्रेमही भरपूर प्रेम मिळालं. संजय दत्तच्या आयुष्यात अशीही एक चाहती आली, तिला तो कधी विसरणार नाही.
7 / 10
2018 साली संजय दत्तला मुंबई पोलिसांचा फोन आला. पोलिसांनी सांगितलं की, 15 दिवसापूर्वी निशा पाटील म्हणून एका महिलेचा मृत्यू झालाय. मृत्यूपूर्वी तिने तिची सर्व संपत्ती संजय दत्तच्या नावावर केली होती.
8 / 10
निशा पाटील यांनी बँकेला अनेक पत्र लिहिली होती. आपण आपली सर्व संपत्ती संजय दत्तच्या नावावर करत असल्याच तिने पत्रात लिहिल होतं.
9 / 10
थोडीथोडकी नव्हे, तब्बल 72 कोटींची संपत्ती निशा पाटील संजय दत्तच्या नावावर सोडून गेल्या होत्या.
10 / 10
निशा पाटील यांनी आपल्या पाठीमागे वारस म्हणून संजय दत्तच नाव लिहिलं होतं. संजय दत्तला या बद्दल समजल्यानंतर त्याने बँकेला सांगून सर्व संपत्ती पाटील कुटुंबाकडेच सोपवली.