वयाची शंभरी गाठली तरी राहाल फिट! फक्त ‘हे’ 5 फायबरयुक्त पदार्थ खा
ओट्स खाण्याचा सल्ला हा जवळपास प्रत्येकजण देतो. वजन कमी करायचं असेल तर हा नाश्ता उत्तम असतो. मधुमेहाच्या रुग्णांसाठी ओट्स खूप प्रभावी असतात. फायबर, जीवनसत्त्व, अँटीऑक्सिडंट्स हे सगळं एकत्र मिळवायचं असेल तर ओट्स खावेत.
1 / 5
तुमच्या पोट आणि आतड्यांचं आरोग्य सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. जवळपास सर्वच आजारांची सुरुवात ही पोट बिघडण्यापासून सुरु होते. पोट आणि आतडे चांगले ठेवायचे असेल तर फायबर खूप महत्त्वाचं. फायबरचा समावेश जर तुम्ही रोजच्या आहारात केलात तर वयाच्या शंभरी पर्यंत तुमचं हृदय आणि तुमचा मेंदू चांगला राहील.
2 / 5
पेर हे फळ फायबरचा चांगला स्रोत आहे. जर आपण १०० ग्रॅम पेर खाल्लं तर आपल्याला ३.१ ग्रॅम फायबर मिळते. जर तुम्ही रोज एक पेर खाल्लं तरी आरोग्याला त्याचा खूप फायदा आहे.
3 / 5
व्हिटॅमिन सी आणि फायबरने समृद्ध असणारी स्ट्रॉबेरी! स्ट्रॉबेरीने फ्लू, व्हायरल इन्फेक्शन, बॅक्टेरियल इन्फेक्शन सारखे आजार होत नाहीत. या फळात फायबर भरपूर प्रमाणात असते.
4 / 5
ओट्स खाण्याचा सल्ला हा जवळपास प्रत्येकजण देतो. वजन कमी करायचं असेल तर हा नाश्ता उत्तम असतो. मधुमेहाच्या रुग्णांसाठी ओट्स खूप प्रभावी असतात. फायबर, जीवनसत्त्व, अँटीऑक्सिडंट्स हे सगळं एकत्र मिळवायचं असेल तर ओट्स खावेत.
5 / 5
डाळींचे आपल्याकडे असंख्य प्रकार आहेतडाळी खाल्ल्याने पोट हलके राहते आणि पचन चांगले होते, चयापचय वाढते. आठवड्यातून ४-५ वेळा डाळीचं सेवन करावं.