पुत्रदा एकादशी निमित्ताने देहूच्या संत तुकाराम महाराज मंदिरात फुलांची आरास केली आहे. विठ्ठल रुक्मिणी यांच्या प्रतिमेस तुळशीच्या माळा तर मुख्य मंदिर गाभाऱ्यात सुंदर आकर्षक सुगंधी फुलांची सजावट पहायला मिळाली.यात झेंडू,तुळस,गुलाब, मोगरा,जाई, चाफा,जुई,आणि जलबेरा या फुलांचा मिलाफ करण्यात आला..यामुळे देहूचा मंदिर परिसर या फुलांच्या सुंगधाने दरवळून गेलाय.
एकादशीचे व्रत हे हिंदू शास्त्रात सर्वोत्तम व्रतांपैकी एक मानले जातो. प्रत्येक महिन्यात दोन एकादशी असतात. सर्व एकादशी भगवान विष्णूला समर्पित करण्यात आल्या आहेत. यानुसार ही वर्षातील पहिली एकादशी आहे.
पौष पुत्रदा एकादशी व्रत करणाऱ्या सर्व भक्तांनी दशमीच्या दिवशी सूर्यास्तापूर्वी भोजन करावे. यामध्ये लसूण-कांदा इत्यादी पदार्थांचा समावेश नसावा. एकादशीला पहाटे उठून स्नान वगैरे करून उपवासाचे व्रत करावे. यानंतर धूप-दीप, फुले, अक्षत, चंदन, नैवेद्य इत्यादी वस्तू देवाला अर्पण केला जातो.
जर तुम्ही उपवास करत असाल तर या विष्णु सहस्रनामाचा पाठ अवश्य करा. यानंतर मुलांच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी संत गोपाल मंत्राचा जप करणे शुभ आहे.
एकादशीच्या दिवशी मांस-मदिराचे सेवन करु नये. असे केल्याने जीवनात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. या दिवशी उपवास करावा. जरी एखाद्या व्यक्तीने उपवास केला नाही तरी एकादशीच्या दिवशी सात्विक अन्नाचे सेवन करावे.