Gut Health | आतड्याच्या आरोग्यासाठी 5 सर्वोत्तम पदार्थ!

| Updated on: Sep 19, 2023 | 12:32 PM

आतड्याच्या आरोग्यासाठी काही पदार्थ खाण्याची गरज असते. हे पदार्थ तुम्ही आहारात समाविष्ट केले तरी तुम्हाला याचा फायदा होईल. आपण काय खातो या गोष्टीला फार महत्त्व आहे. त्यामुळे खाताना विचार केला तर येणाऱ्या समस्यांना आळा बसू शकतो. कोणते पदार्थ आहेत हे? बघुयात...

1 / 5
बडीशेप: बडीशेप पचनासाठी चांगली असते म्हणून बरेचदा बडीशेप जेवणानंतर खाल्ली जाते. बडीशेप मुळे जळजळ कमी होते, गॅस होत नाही आणि सूज येण्यासारख्या समस्या सुद्धा उद्भवत नाहीत. बडीशेप पाण्यात भिजवून ते पाणी प्यायल्यास सुद्धा आरोग्यास मदत होते.

2 / 5
पपई: पपई अपचन आणि सूज कमी करू शकते. पपई आरोग्यासाठी खूप चांगली असते. पचन प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी पपई खा. पपई मध्ये एन्झाइम पॅपेन असते. पपईने गट हेल्थ चांगली होते आणि मेटॅबॉलिझम सुद्धा चांगलं होतं.

3 / 5
फायबर असलेले पदार्थ: ओट्स, धान्य, भाज्या, फळे यात फायबर असतं. फायबर आरोग्यासाठी उत्तम असतं. बद्धकोष्ठता टाळण्यासाठी फायबर युक्त अन्न खा.

4 / 5
आंबवलेले पदार्थ: तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की आंबवलेले पदार्थ आरोग्यासाठी खूप चांगले असतात. नाश्त्यामध्ये आपल्याला डोसा, इडली, अप्पे असे पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. यात प्रोबायोटिक्स असतात, प्रोबायोटिक्सने आतड्याचे आरोग्य चांगले होते.

5 / 5
केळी: केळीमध्ये पोटॅशियम आणि फायबर चांगल्या प्रमाणात असतं. स्नॅक्स म्हणून तुम्ही केळीचे सेवन करू शकता. केळीने पोट पटकन भरतं आणि भूक लवकर लागत नाही. वजन नियंत्रित ठेवायला केळी खूप फायदेशीर ठरते. केळीचा समावेश तुम्ही स्मूदी मध्ये करू शकता, ब्रेकफास्ट बाऊल मध्ये सुद्धा केळी समाविष्ट करा.