लिंबू आणि लिंबाचा रस हे सुद्धा असे पदार्थ आहेत फ्रिजमध्येच स्टोअर करायला हवेत. बाहेर ठेवल्यास लिंबू आणि लिंबाच्या रसाची चव बदलत जाते. आंबट होत जाते, प्रसंगी त्याची चव नाहीशी सुद्धा होऊ शकते. त्यामुळे लिंबू आणि लिंबाचा रस रेफ्रिजरेट करू नये पण फ्रिजमध्ये ठेवावं.
अंडी बाहेर ठेवल्यास खराब होतात. अंड्याचं निर्जंतुकीकरण केलं जातं त्यामुळे त्याचं शेल कमजोर होतं अशा परिस्थितीत जर अंडं बाहेर ठेवलं तर ते खराब होऊ शकतं.जास्त दिवस टिकवायचं असल्यास अंडे फ्रिजमध्येच ठेवावीत.
आपला हा गैरसमज आहे की जॅम कपाटात ठेवला तर तो चांगला राहू शकतो, खराब न होता. जॅम फ्रिजमध्ये जास्त चांगला आणि अधिक काळासाठी राहतो. जॅम फ्रिजमध्ये ठेवला की तो तसाच घट्ट राहतो, त्याचा रंग बदलत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे त्याची चव बदलत नाही.
खजूर एका डब्ब्यात बंद करून फ्रिजमध्ये ठेवा. जर खजूर बाहेर ठेवलं तर ते कोरडे होतील आणि त्याची चव राहणार नाही. खजुराची चव टिकवून ठेवायची असेल तर त्याचा ओलावा टिकवून ठेवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी फ्रिजमध्ये ते स्टोअर करून ठेवा.
काजू, मनुके, किशमिश म्हणजेच काय तर ड्रायफ्रुट्स फ्रिजमध्ये ठेवायला हवेत. हे पदार्थ फ्रिजमध्ये ठेवल्यास व्यवस्थित राहतात. ड्रायफ्रुट्स फ्रिजमध्ये कितीही दिवस राहू शकतात. बाहेर ठेवल्यास हे लवकर खराब होतात.