'बिग बॉस 17'च्या घरात आणि सोशल मीडियावर अभिनेत्री अंकिता लोखंडेचा पती विकी जैन जोरदार चर्चेत आला आहे. विकीला बिग बॉसच्या घरातील 'मास्टरमाईंड' असंही म्हटलं जात आहे. प्रेक्षक जरी विकीला पहिल्यांदा छोट्या पडद्यावर बघत असले तरी मनोरंजनसृष्टीशी त्याचं खूप जुनं नातं आहे.
अंकिता लोखंडेशी लग्न करण्याआधी विकी हा टिया बाजपेयीला डेट करत होता. टिया ही अभिनेत्री असून तिने टेलिव्हिजन इंडस्ट्रीत काम केलंय. 2012 मध्ये दोघं रिलेशनशिपमध्ये होते. टियाने '1920: एव्हिल रिटर्न्स' या चित्रपटातही काम केलं होतं.
विकी जैनने याआधीही बिग बॉसच्या घरात हजेरी लावली होती. 'बिग बॉस 4'मध्ये सारा खान आणि अली मर्चंट यांनी घरातच लग्न केलं होतं. त्यावेळी विकी त्या लग्नासाठी बिग बॉसच्या घरात पोहोचला होता. तेव्हाचा त्याचा व्हिडीओसुद्धा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
विकीला क्रिकेटची आवड असल्याने त्याने बॉक्स क्रिकेट लीगमध्ये पैसे गुंतवले आहे. मुंबई टायगर्स या टीमचा तो सहमालक आहे. या क्रिकेट टीमच्या शोदरम्यान अंकिता आणि विकी पहिल्यांदा एकमेकांना भेटले होते.
छत्तीसगडमधील रायपूरमध्ये जन्मलेल्या विकीचं कुटुंब अत्यंत श्रीमंत आहे. वडील विनोद कुमार जैन आणि आई रंजना जैन या दोघांचाही बिझनेस आहे.
JBIMS मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर विकीने कौटुंबिक बिझनेस आपल्या हाती घेतला. विकी हा सध्या महावीर इन्स्पायर ग्रुपचा मॅनेजिंग डायरेक्टर आहे. ही कंपनी कोळसा ट्रेडिंग, लॉजिस्टिक्स, पॉवरप्लान्ट, रिअल इस्टेट आणि डायमंड क्षेत्रातील नामांकित कंपनी आहे.
जंजगीर इथल्या कोळसा वॉशरीजचा तो मालक आहे. त्याच्या कोळसा व्यवसायाची एकूण संपत्ती ही 100 कोटी रुपयांच्या घरात आहे. इतकंच नव्हे तर रिअल इस्टेटमध्येही विकीच्या कुटुंबीयांचा चांगला व्यवसाय आहे. महावीर बिल्डर्स अँड प्रमोटर्स ही त्यांचीच कंपनी आहे.
विकीला फिरण्याची प्रचंड आवड आहे. गेल्या काही वर्षांत तो प्राग, नेदरलँड्स, फ्रान्स, इंग्लंड यांसारख्या विविध देशांमध्ये फिरला आहे. मुंबईत अंकिता आणि विकीचा 8 बीएचके आलिशान फ्लॅट आहे.