'गंगूबाई काठियावाडी' चित्रपटात अभिनेता विजय राज रझियाबाईची भूमिका साकारताना दिसणार आहे. विजयची भूमिका एका ट्रान्सजेंडरपासून प्रेरित आहे. एखाद्या अभिनेत्याने चित्रपटात ट्रान्सजेंडरची भूमिका साकारण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेक चित्रपटांमध्ये पुरुष कलाकार ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत दिसले आहेत. आज आपण याबद्दल चर्चा करणार आहोत.
जॉनीने आत्तापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये तृतीयपंथीयांची भूमिका केली आहे. पंरतु जीत आणि हाऊसफुल्ल 4 मधील भूमिका सगळ्यांच्या लक्षात राहिल अशी आहे.
कंचना चित्रपटात राघव लॉरेंसयाने तृतीयपंथीयाची भूमिका केली होती. हा चित्रपट हॉरर कॉमेडी होता. तसेच त्या चित्रपटात अनेक मोठे कलाकार सुध्दा होते.
सदाशिव अमरापूर यांनी महाराणी यांचं भुमिका कोणीचं विसरू शकतं नाही. त्यासाठी त्यांना अधिक पुरस्कार सुध्दा मिळाले होते.
परेश रावल यांनी तमन्ना चित्रपटात तृतीयपंथीयाचा रोल केला होता. तसेच त्या चित्रपटात पूजा भट्ट, शरद कपूर आणि मनोज वाजपेयी सुध्दा होते.
महेश मांजरेकरांनी रज्जो चित्रपटात तृतीयपंथीयाची भूमिका केली होती. या भूमिकेमुळे ते अधिक चर्चेत देखील होते.
आलिया भट्टच्या 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटात विजय राज रझियाबाई नावाच्या ट्रान्सजेंडरची भूमिका साकारताना दिसणार आहे. विजयच्या लूकपासून त्याच्या अभिनयापर्यंत सर्वत्र चर्चा रंगत आहेत.
आशितोष राणाने देखील संघर्ष चित्रपटात तृतीयपंथीयाची भूमिका केली होती. त्यावेळी त्याच्या भूमिकेचं नाव लज्जा शंकर पांडे असं होतं.