वेदाविद ते अकाय.. या सेलिब्रिटींनी संस्कृत शब्दावरून ठेवली मुलांची नावं
अभिनेत्री यामी गौतमने नुकतंच तिच्या बाळाचं नाव सांगितलं. वेदाविद हे नाव नेटकऱ्यांना खूपच अनोखं आणि नवीन वाटलं. हे नाव संस्कृत शब्दावरून असून याआधी इतरही सेलिब्रिटींनी त्यांच्या मुलांची नावं संस्कृत शब्दावरून ठेवली आहेत.
1 / 5
अभिनेत्री यामी गौतमने 10 मे रोजी मुलाला जन्म दिला. काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर पोस्ट लिहित तिने चाहत्यांना ही गोड बातमी सांगितली. या पोस्टमध्ये तिने मुलाचं नावसुद्धा जाहीर केलं. यामीच्या मुलाचं 'वेदाविद' हे नाव नेटकऱ्यांना खूप अनोखं वाटलं. यामीप्रमाणेच इतरही असे सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी त्यांच्या मुलांची नावं संस्कृत शब्दावरून ठेवली आहेत. वेदाविद या नावाचा अर्थ म्हणजे वेदांचं ज्ञान असणारा. हे विष्णुचंही एक नाव आहे.
2 / 5
क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या आयुष्यात 2021 मध्ये चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं. दोघांनी त्यांच्या मुलीचं नाव वामिका असं ठेवलंय. वामिका हे नावसुद्धा संस्कृतमधील असून ते दुर्गा देवीचंही एक नाव आहे.
3 / 5
अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी त्यांच्या मुलीचं नाव 'राहा' असं ठेवलंय. रणबीरची आई नीतू कपूर यांनी हे नाव सुचवलं होतं. संस्कृतमध्ये राहा या शब्दाचा अर्थ 'कुळ' असा होतो तर बंगालीमध्ये याचा अर्थ आराम आणि स्वाहिलीमध्ये आनंद असा होतो.
4 / 5
अनुष्काने यावर्षी फेब्रुवारी महिन्यात मुलाला जन्म दिला. विराट आणि अनुष्काने त्यांच्या मुलाचं नाव 'अकाय' असं ठेवलं आहे. अकाय हे नावसुद्धा अनोखं असल्याने नेटकऱ्यांनी गुगलवर त्याचा अर्थ शोधण्यास सुरुवात केली होती. संस्कृतमध्ये अकाय या शब्दाचा अर्थ असा आहे की ज्याचा कधीच क्षय होत नाही. अकायचा अर्थ अमर असाही होतो.
5 / 5
अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी त्यांच्या मुलीचं नाव मालती मेरी असं ठेवलं. दोघांनीही त्यांच्या आजीच्या मधल्या नावावंवरून मुलीचं नाव ठेवलंय. मालती हे प्रियांकाची आई मधू चोप्रा यांचं मधलं नाव आहे तर मेरी हे निकची आई डेनिस जोनास यांचं मधलं नाव आहे. संस्कृतमध्ये मालती या शब्दाचा अर्थ सुवासिक फूल (जाई) असा होतो