आरोग्यासाठी उत्तम असतात या फळांच्या साली, कोणती फळे? बघा
फळे सोलून खायचं फॅड हल्ली आलंय. एखाद्या मोठ्या हॉटेलात किंवा एखाद्या पॉश ठिकाणी गेलं की फळे सोलून, कापून ती ताटात ठेवलेली असतात. मग लोक ती फळे काटा चमच्याने खातात. स्टाईलच्या नावाखाली असे अनेक प्रयोग केले जातात. पण प्रत्यक्षात फळांच्या सालीचे खूप अनेक फायदे असतात. कोणती फळे आहेत ही जी सोलून खाऊ नयेत? वाचा
1 / 5
सालीमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स आढळतात. ही जी मोजकी फळे आहेत ज्यांच्या सालीमध्ये असे गुणधर्म असतात ती फळे चुकूनही सोलून खाऊ नयेत. बघुयात कोणती फळे आहेत ही...
2 / 5
पेर म्हणजेच नास्पती हे फळ नेहमी सालीसकट खावं. पेर च्या सालीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे आढळतात. काही फळांचं साल काढू नये, त्या फळांना सालीसकट खावं त्यांच्या सालीमध्ये सुद्धा अनेक फायदे असतात. यात डायटरी फायबर असतं.
3 / 5
रोज एक सफरचंद खा असं आपल्याला नेहमी सांगितलं जातं. आजकाल फॅशन म्हणा किंवा आणखी काय म्हणा सफरचंद सोलून खायचं सुद्धा फॅड आलंय. तुम्ही जर सफरचंद खात असाल तर ते सोलू नका सालीसकट खा! अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर असे गुणधर्म सफरचंदाच्या सालीत असतात.
4 / 5
पेरू सालीबरोबर खावा. पेरूमध्ये अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे, तंतू आणि खनिजे असतात. नुसता पेरूच नाही तर त्याच्या सालीचे देखील आरोग्यासाठी अनेक फायदे असल्याने पेरू कधीही सोलू नये.
5 / 5
किवीचे सेवन आपल्या हाडांसाठी देखील फायदेशीर आहे, यामुळे सांधेदुखी दूर होते. जे लोक मानसिक समस्यांना बळी पडतात त्यांनी तणाव कमी करण्यासाठी किवी खाणे आवश्यक आहे. किवी मुळे आपली रोगप्रतिकारशक्ती खूप वाढते, यामुळे अनेक आजार आणि इन्फेक्शनचा धोका कमी होतो.