RT-PCR चाचणी म्हणजे काय ? चाचणी कशी केली जाते ?, जाणून घ्या संपूर्ण माहिती

| Updated on: May 13, 2021 | 6:06 PM

सर्वांत विश्वसनीय आणि अचूक माहिती देणारी चाचणी पद्धत म्हणून RT-PCR टेस्टचे नाव घेतले जाते. (full form all information of rt pcr test)

1 / 5
देशात कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होत आहे. संसर्ग थोपवण्यासाठी जास्तीत जास्त टेस्टिंग करुन रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. सध्या देशात अनेक प्रकारे संशयित रुग्णांची चाचणी करण्यात येतेय. मात्र, यापेकी सर्वांत विश्वसनीय आणि अचूक माहिती देणारी चाचणी पद्धत म्हणून RT-PCR टेस्टचे नाव घेतले जाते. पण ही टेस्ट म्हणजे नेमकं काय असतं ? याबद्दल तुम्हाला माहिती आहे का ? नसेल तर जाणून घ्या RT-PCR टेस्टविषयीची संपूर्ण माहिती

2 / 5
आरटी-पीसीआर (RT-PCR) म्हणजे रिव्हर्स ट्रान्सकिप्शन पॉलीमर्स चेन रिअ‌ॅक्शन (Reverse Transcription Polymerase Chain Reaction) होय. या टेस्टच्या माध्यमातून कोरोना विषाणूची लागण झालेल्या संशयिताची चाचणी केली जाते. या चाचणीमध्ये कोरोना विषाणूच्या आरएनए (RNA) ची चाचणी केली जाते. या चाचणीदरम्यान शरीरातील वेगवेगळ्या भागांचे नमुने घ्यावे लागतात. सध्यातरी चाचणी करताना नाक आणि घशातून नमुने घेतले जातायत.

3 / 5
RT-PCR चाचणीचा रिपोर्ट येण्यासाठी जवळपास 4 ते 8 तास लागू शकतात. मात्र, सध्या कोरोना संशयितांची मोठ्या प्रमाणात चाचणी होत असल्यामुळे चाचणीचे निकाल येण्यासाठी काही ठिकाणी 1 ते 6 दिवससुद्धा लागू शकतात. ट्रूनॅट टेस्ट (TrueNat Test) आणि अँटिजन टेस्टच्या (AntiGen Test) तुलनेत RT-PCR टेस्टचा निकाल अचूक आणि विश्वासपूर्ण आहे.

4 / 5
आरटी पीसीआर टेस्टच्या माध्यमातून शरीरातील कोरोनाचे विषाणूचा शोध घेता येऊ शकतो. म्हणजे कोरोनाने शरीरात शिरकाव केलेला असेल तर आरटी-पीसीआर टेस्टच्या माध्यमातून ते समजून येऊ शकते. रुग्णांना कोरोनाची लक्षणं नसली तरी या चाचणीच्या माध्यमातून त्याचा शोध घेता येऊ शकतो. मात्र, या चाचणीद्वारे रुग्णामध्ये कोरोनाची किती प्रमाणात लागण झाली आहे, याचा शोध घेता नाही.

5 / 5
RTPCR Test

RTPCR Test