सनी देओलच्या 'गदर 2' या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. जेव्हापासून या चित्रपटाची घोषणा झाली आणि त्याचा पहिला पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आला, तेव्हापासून चाहते चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या सेटवरील एक व्हिडीओ व्हायरल झाला होता.
गदर 2 हा चित्रपट येत्या 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या मुख्य भूमिका आहेत. गदर: एक प्रेम कथा या पहिल्या भागातील बऱ्याच कलाकारांना सीक्वेलमध्ये स्थान देण्यात आलं आहे. 2001 मध्ये गदर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या करिअरमधील हा सर्वांत हिट चित्रपट होता. अनिल शर्मा यांनी सीक्वेलचं दिग्दर्शन केलं आहे. रिपोर्ट्सनुसार या चित्रपटाचं एकूण बजेट 100 कोटींच्या घरात आहे.
सनी देओलने या चित्रपटात तारा सिंगच्या भूमिकेसासाठी 5 कोटी रुपये घेतले आहेत. तर अमिषा पटेलने सकिनाच्या भूमिकेसाठी 2 कोटी रुपये मानधन घेतलं आहे.
'गदर 2'मध्ये सनी देओलच्या मुलाची भूमिका साकारणाऱ्या उत्कर्ष शर्माला एक कोटी रुपये मानधन देण्यात आलं आहे. याशिवाय सिमरत कौरने 80 लाख रुपये तर मनिष वाधवाने 60 लाख रुपये फी घेतली आहे.