‘घरोघरी मातीच्या चुली’मध्ये लगीनघाई; रणदिवेंच्या घरी येणार जानकीची जाऊबाई
'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेत लग्नाची धामधूम पहायला मिळत आहे. रणदिवेंच्या घरी जानकीची जाऊबाई येणार आहे. तर हळदीच्या कार्यक्रमात 'ठरलं तर मग' मालिकेतील सायलीची खास उपस्थिती असेल.
1 / 7
रणदिवे आणि विखेपाटील कुटुंबात सारंग आणि ऐश्वर्याच्या लग्नाची धामधूम सुरू आहे. खरंतर दोन कुटुंबातलं वैर मिटावं म्हणून जानकी-ऋषिकेशने पुढाकार घेत ऐश्वर्या आणि सौमित्रच्या लग्नाचा घाट घातला.
2 / 7
मात्र सौमित्रने अवंतिकासोबतच लग्न करण्याचं ठरवत ऐन लग्नाच्या धामधूमीत पळून जायचं ठरवलं. संतापलेल्या ऐश्वर्याला सौमित्रसोबतच लग्न करायचं आहे.
3 / 7
त्यासाठी तिने सारंगशी लग्न करण्याचं ठरवत नवा डाव आखलाय. सौमित्रला किडनॅप करुन ऐन मांडवात सारंग ऐवजी सौमित्रसोबतच लग्न करण्याचा तिचा डाव आहे. ऐश्वर्याचा हा डाव यशस्वी होणार का? हे मालिकेच्या पुढील भागांमधून उलगडेल.
4 / 7
ऐश्वर्याचं लग्न सौमित्रसोबत होणार की सारंगसोबत याची उत्कंठा असली तरी विखेपाटील आणि रणदिवे कुटुंबात लग्नाची तयारी सुरु झालीय.
5 / 7
हळद, मेहंदी, संगीत आणि लग्न सगळं काही अगदी साग्रसंगीत पार पडणार आहे. हळदीच्या कार्यक्रमासाठी खास पाहुणी म्हणून 'ठरलं तर मग' मालिकेतली सायली येणार आहे.
6 / 7
मेहंदी, संगीत आणि लग्नातही स्टार प्रवाह परिवारातले सदस्य खास हजेरी लावणार आहेत. 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेचा हळदी विशेष भाग प्रेक्षकांना स्टार प्रवाह वाहिनीवर पहायला मिळणार आहे.
7 / 7
18 मार्चपासून 'घरोघरी मातीच्या चुली' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. यामध्ये 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे आणि पौराणिक मालिकांमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता सुमीत पुसावळे मुख्य भूमिका साकारत आहेत.