बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मलायका तिच्या फिटनेसबद्दल खूप जागृत आहे. तिचे जिमच्या बाहेरचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
मलायका अरोराच्या फोटोंमध्ये तिची स्टाईल नेहमीच पाहायला मिळते. मलायकाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास तिला शेवटी सोनी टीव्हीवर ‘इंडियाज बेस्ट डान्सर’मध्ये जजच्या भूमिकेत पाहिले गेले होते. गीता कपूर आणि टेरेंस लुईस यांच्यासमवेत तिने या कार्यक्रमाच्या परीक्षणाची धुरा सांभाळली होती. याशिवाय मलायका अरोरा तिच्या योगा व्हिडीओ आणि फोटोंसाठीसुद्धा खूप प्रसिद्ध आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून अर्जुन कपूर आणि मलायका अरोराच्या अफेअर असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र त्या दोघांनी याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) नेहमीच आपल्या स्टाईल आणि अनोख्या अंदाजाने लोकांची मने जिंकताना दिसते. ती नेहमीच फिटनेसला अधिक महत्त्व देताना दिसते, त्याचबरोबर बॉलिवूडची सर्वात स्टायलिश अभिनेत्री म्हणूनही ती ओळखली जाते.
नववर्षाचं सेलिब्रेशन करण्यासाठी मलायका आणि अर्जुन गोव्याला गेले होते तेथील काही फोटो सोशम मीडियावर शेअर करण्यात आले होते.
मलायकाने #malaikastrickortip च्या खाली एक व्हिडीओ तयार केला होता आणि केस गळती कशी थांबवावी याच्या टिप्स दिल्या होत्या.