Google त्याच्या आगामी Chrome 100 (Google Chrome V100) च्या रिलीझसह क्रोम लाइट मोड फिचर बंद करत आहे. जे अनेक वर्षांपासून Android वर उपलब्ध आहे. कंपनीने गुरुवारी याची घोषणा केली आहे. 9to5 Google च्या अहवालानुसार, Android साठी Chrome मध्ये Lite Mode Data Saver ची रीब्रांडेड आवृत्ती आहे. अहवालात असे म्हटले आहे की हे निश्चितपणे एक आवश्यक फिचर आहे, परंतु अलिकडच्या काळात त्याची गरज कमी झाली आहे.
एका पोस्टमध्ये, Google ने या आठवड्यात क्रोममधील लाइट मोड V100 अपडेटसह बंद केला जाईल, जो 29 मार्च रोजी होणार आहे, असं म्हटंले आहे.
Google च्या म्हणण्यानुसार 29 मार्च 2022 रोजी Chrome M100 च्या रिलीझसह लाइट मोड बंद करणार आहोत, Android साठी Chrome फिचर जे आम्ही 2014 मध्ये Chrome डेटा सेव्हर म्हणून लाॅन्च केले होते.
गुगलने ‘या’ दहा अॅप्सवर घातली बंदी
Chrome वर लाइट मोड वापरण्याचा कोणताही पर्याय नसेल. हे फिचर अधिकृतपणे Chrome 100 आणि त्यावरील आवृत्तीवरून काढून टाकले जाईल. वापरकर्त्यांना अजूनही अधिक डेटा जतन करायचा असल्यास, ते Opera Mini सारखे इतर ब्राउझर वापरू शकतात.