परवाना असलेल्या बंदुकीतून चुकून गोळी सुटल्याने मंगळवारी पहाटे अभिनेता गोविंदा जखमी झाला. गोविंदाच्या पायाला गोळी लागली असून रुग्णालयातील आयसीयूमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
तो लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी त्याचे कुटुंबीय आणि चाहते प्रार्थना करत आहेत. गोविंदाची मुलगी टीना अहुजा त्याच्यासोबत रुग्णालयात आहे. तिने वडिलांच्या प्रकृतीसाठी महामृत्युंजय जप करवून घेतला.
टीनाने उज्जैनच्या महाकाल मंदिराचे पुजारी रमन गुरू त्रिवेदी यांना फोन केला आणि बाबांच्या प्रकृतीसाठी महाकालेश्वर मंदिरात महामृत्युंजय जप करण्यास सांगितलं.
टीनाच्या विनंतीनंतर उज्जैनच्या महाकाल मंदिरातील पुजाऱ्यांनीही पूजा केली. महाकालेश्वर मंदिराचे पंडित रमण त्रिवेदी यांनी सांगितलं की 51 पंडित आणि बटुकांद्वारे महामृत्युंजय जप करण्यात आला.
गोविंदा लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी हा जप करण्यात आला. गोविंदा आणि त्याच्या कुटुंबीयांची महाकालेश्वरवर खूप श्रद्धा आहे. सात महिन्यांपूर्वीच गोविंदा उज्जैनच्या या मंदिरात गेला होता.