हानिया आमिर ही पाकिस्तानी इंडस्ट्रीतील आघाडीची अभिनेत्री आहे. तिचा प्रत्येक शो ट्रेंडमध्ये असतो. हानियाच्या सौंदर्यावर जगभरातील असंख्य चाहते फिदा आहेत. सध्या ती 'कभी मैं कभी तुम' या मालिकेत काम करतेय. ही मालिकासुद्धा प्रेक्षकांमध्ये चांगलीच लोकप्रिय आहे.
या मालिकेत हानिया ही अभिनेता फहाद मुस्तफासोबत काम करतेय. फहादने जवळपास दहा वर्षांनंतर पुनरागमन केलंय. मालिकेतील हानिया आणि फहाद यांच्या रोमँटिक केमिस्ट्रीने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. या दोघांची ऑनस्क्रीन लव्हस्टोरी सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे.
या मालिकेत हानिया तिच्यापेक्षा 14 वर्षांनी मोठ्या असलेल्या फहादसोबत रोमान्स करताना दिसून येत आहे. फहाद 41 वर्षांचा आणि हानिया 27 वर्षांची आहे.
'कभी मैं कभी तुम' या मालिकेत हानियाचं (शरजीना) लग्न अदिलसोबत होणार होतं. मात्र अदिल ऐनवेळी लग्न मोडतो. त्यामुळे हानियाचं लग्न अदिलचा छोटा भाऊ मुस्तफाशी होतं.
त्यानंतर सोशल मीडियावर ही मालिका चांगलीच चर्चेत आली आहे. कारण हानिया आमिरच्या मालिकांमध्ये नेहमीच असं पहायला मिळतं. तिचं लग्न ऐनवेळी मोडतं किंवा दुसऱ्याच व्यक्तीशी लग्न होतं.