रामटकेच्या राखी तलावात अठराभूजाधारी गणेशाची मूर्ती सापडली. नागवंशीय काळातील कलाकृती आहे. संरक्षण करण्यासाठी अठरा भूजांवर अठरा शस्त्र आहेत. त्यात मोरपंखी लेखणी आणि मोदकही आहे.
नागपुरातील ज्येष्ठ नागरिक मंडळातील सहल तिथं काल गेली होती. त्यावेळी ज्येष्ठांनी ही मूर्ती बघितली. रामटेकच्या महागणपतीच्या मंदिरात या अठराभूजाधारी गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
रामटेकमधील सातपुडा पर्वताच्या पर्वतरांगा जातात. शैल्य पर्वत परिसरात तलावही भरपूर आहेत. महागणपतीच्या मंदिरातून रामटेकच्या गडाचंही दर्शन होते.
अदासा येथे गणपतीचं प्रसिद्ध मंदिर आहे. वामनानं बळी राजाचे यज्ञ विफल करण्यासाठी गणपतीची आराधना केली. त्यात यश मिळाल्यानंतर वामनानं शमी वृक्षाच्या छायेखाली या मूर्तीची स्थापना केल्याचं सांगितलं जातं.
अदासा येथील गणेशाचं मंदिर टेकडीवर आहे. टेकडीवरून नयनरम्य असा परिसर दिसतो. टेकडीवर भक्तांसाठी राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
नागपूरचा टेकडी गणेश स्वयंभू आहे. या मंदिरात गणेश उत्सवानिमित्त सध्या मोठी गर्दी असते. ज्येष्ठ नागरिकांनी या टेकडी गणेशाच्या मूर्तीचं दर्शन घेतलं.