लग्नाच्या नवसासाठी ओळखली जाणारी पुण्यातील पिवळी जोगेश्वरी देवी; कुठे आहे मंदिर?

| Updated on: Oct 08, 2024 | 12:10 PM

दर्शनमूर्तीचे स्फटिक पिवळे असल्याने ही देवी 'पिवळी जोगेश्वरी' म्हणून ओळखली जाते. हे मंदिर सुमारे 200 वर्षे जुनं असल्याचं म्हटलं जातं. नवरात्रीच्या नऊ दिवसांत विविध वाहनांवर आरूढ अशा या देवीची पूजा केली जाते.

1 / 5
पुण्यातील पिवळी जोगेश्वरी देवीकडे भक्त त्यांचा विवाह जमावा म्हणून नवस करतात. मूळ तांदळा आणि दर्शनरुपी स्वरुपात ही देवी पहायला मिळते. दर्शनमूर्तीचे स्फटिक पिवळे असल्याने ही देवी 'पिवळी जोगेश्वरी' म्हणून ओळखली जाते.

2 / 5
पुण्यात तांबडी जोगेश्वरी, काळी जोगेश्वरी आणि पिवळी जोगेश्वरी अशी जोगेश्वरीची तीन मंदिरं आहेत. शुक्रवार पेठेमध्ये पंचमुखी मारुती चौकामध्ये पिवळी जोगेश्वरी देवीचं मंदिर आहे. हे मंदिर जवळपास 200 वर्षांपूर्वीचं असल्याचं म्हटलं जातं.

3 / 5
पिवळी जोगेश्वरी ही लग्न जुळवण्यासाठी प्रसिद्ध आहे. या देवीला पिवळ्या वस्तू वाहण्याची परंपरा आहे. ज्यांचं लग्न जुळत नसेल किंवा विवाहात काही अडचणी येत असतील तर त्यांनी पिवळ्या तांदळाच्या पाच मुठी देवीसमोर वाहिल्यास त्याचं लग्न जुळून येतं, असं म्हटलं जातं.

4 / 5
देवीची मूर्ती पिवळ्या छटेची असून तीची उंची सव्वा दोन फूट इतकी आहे. या अष्टभुजा देवीच्या हातात विविध आयुधं आहेत. पिवळी जोगेश्वरी देवीची मूर्ती ही महिषासूरमर्दिनी स्वरुपातील आहे.

5 / 5
हे देवस्थान खाजगी असून सध्या त्याची मालकी सुधा श्रीकांत महाजन यांच्याकडे आहे. सध्या या मंदिराचं व्यवस्थापन कुलकर्णी कुटुंबाकडे आहे. नवरात्रौत्सवात या देवीची विविध रुपांमध्ये पूजा केली जाते.