God’s favorite flower : शास्त्र असतं हे ! देवांच्या आवडी निवडी लक्षात ठेवायलाच हव्यात, कोणत्या देवाला कोणतं फूल ?
परंतु शास्त्रामध्ये अशी देखील फुले सांगितलेली आहेत, जी वाहिल्यामुळे देवाची कृपा प्राप्त होते. ही फुले अतिशय शुभ आणि देवतांना विशेष प्रिय असतात ही वाहिल्याने देव प्रसन्न होतात. जाणून घेऊ कोणत्या देवाला कोणतं फूल वाहिलं पाहिजे.
कोणत्या देवाला कोणतं फूल ?
Image Credit source: facebook
-
-
श्रीगणेश – आचार भूषण ग्रंथानुसार भगवान श्री गणेशाला तुलसीपत्र सोडून बाकी सर्व प्रकारची फुले वाहिली तरी चालतात. पद्मपुराण आचाररत्न मध्ये देखील लिहिले आहे की ‘न तुलस्या गणाधिपम्’, अर्थात तुलसीपत्राने गणेशाची पूजा कधीही करू नका. केवळ गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशाला तुळशीपत्र वाहता येते. गणपतीला दुर्वा वाहण्याची प्रथा आहे. गणपतीला दुर्वा अत्यंत प्रिय आहेत. दुर्वांच्या वरच्या भागाला तीन किंवा पाच पाने असतील तर फारच उत्तम
-
-
शंकर – भगवान शंकराला धोतऱ्याची फुले, हरसिंगार, नागकेशराची पंढरी फुले, सुके कमळाचे गट्टे, कणेर, कुसुम, आक, कुश इत्यादींची फुले अर्पण करण्याची प्रथा आहे. भगवान शंकराला धोतऱ्याची फुले सर्वाधिक प्रिय आहेत. या व्यतिरिक्त त्यांना बेलपत्र आणि शमीची पाने वाहणे देखील अत्यंत शुभ मानले जाते. भगवान शंकराला सेमल, कदम्ब, डाळिंब, शिरीष, माधवी, केवड़ा, मालती, जुई आणि कपाशीची फुले वाहिली जात नाहीत.
-
-
लक्ष्मी – लक्ष्मी मातेचे सर्वाधिक प्रिय पुष्प कमळ हे आहे. तिला पिवळे फूल वाहून देखील प्रसन्न करता येते. तिला लाल गुलाबाचे फूल देखील अत्यंत प्रिय आहे.
-
-
भगवती गौरी – शंकर भगवानाला वाहिली जाणारी फुले माता भगवतीला देखील प्रिय आहेत. या व्यतिरिक्त बेल, पांढरे कमळ, पलाश, चाफा इत्यादी फुले देखील वाहिली जाऊ शकतात
-
-
बजरंग बली – बजरंग बलीला लाल आणि पिवळ्या रंगाची फुले विशेष करून वाहिली पाहिजेत. या फुलांमध्ये गुडहल, गुलाब, कमळ, गोंडा यांचे विशेष महत्त्व आहे. या फुलांनी हनुमानाचे नित्य पूजन केल्याने आणि केशरा सोबत उगाळलेल्या लाल चंदनाचा टिळा लावल्याने भाविकांच्या सर्व मनोकामना लवकर पूर्ण होतात.
-
-
भगवान विष्णू – भगवान विष्णूला कमळ, मौलसिरी, जुई, कदम्ब, केवडा, चमेली, अशोक, मालती, वासंती, चाफा, वैजयंती यांची फुले विशेष प्रिय आहेत. त्यांना याची पिवळी फुले अधिकच पसंत आहेत. तुलसीपत्र वाहिल्याने भगवान विष्णू शीघ्र प्रसन्न होतात. कार्तिक महिन्यात केतकीच्या फुलांनी पूजा केल्याने भगवान विष्णू विशेष रूपाने प्रसन्न होतात. परंतु विष्णूवर आक, धोतरा, शिरीष, सहजन, सेमल, कचनार आणि गुलमोहर ही फुले कधीच वाहू नयेत. विष्णूला कधीही अक्षता अर्पण करू नयेत.
-
-
श्रीकृष्ण – आपल्या प्रिय फुलांचा उल्लेख महाभारतात करताना श्रीकृष्ण युधिष्ठिराला म्हणतात, “मला कुमुद(कमळ), करवरी, चणक, मालती, नंदिक, पलाश आणि वनमालेची फुले अत्यंत प्रिय आहेत”
-
-
सरस्वती माता – विद्येची देवता माता सरस्वती हिला प्रसन्न करण्यासाठी पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाची फुले वाहिली जातात. सफेद गुलाब, सफेद कणेर किंवा पिवळ्या गोंड्याचे फूल यांच्यामुळे सरस्वती माता अतिशय प्रसन्न होते.
-
-
दुर्गा माता – दुर्गा मातेला लाल गुलाब आणि गुडहल यांची फुले अत्यंत प्रिय आहेत. दुर्गा मातेला बेल, अशोक, माधवी, केवडा, अमलतास यांची देखील फुले वाहिली जातात. परंतु मातेला दुर्वा, तुलसीपत्र आणि तमाल फुले कधीही अर्पण केली जात नाहीत.
-
-
सूर्य नारायण – यांची उपासना कुटजाच्या फुलांनी केली जाते. या व्यतिरिक्त आक, कणेर, कमळ, चाफा, पलाश, अशोक, बेल, आक, मालती इत्यादींची फुले देखील त्यांना प्रिय आहेत. भविष्य पुराणात तर हे देखील सांगितलेले आहे की सूर्य देवावर जर एक आकाचे फूल वाहिले तर त्यामुळे दहा सुवर्णाचे अलंकार चढवल्याइतके पुण्य मिळते. सूर्यदेवाला लाल फुले सर्वाधिक प्रिय आहेत.