Health care in Winter: अस्थमाच्या आजारावर हे घरगुती उपाय आहेत रामबाण इलाज
थंडींच्या (Winters) दिवसांमध्ये अस्थमा असलेल्या व्यक्तीला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यांना श्वास घेण्यासाठी देखील त्रास होतो. त्यामुळे अशा व्यक्तींना थंडीच्या दिवसांमध्ये विशेष काळजी घ्यावी लागते. असे अनेक घरगुती उपाय आहेत. ज्याचा उपयोग केल्यास अशा व्यक्तींना आराम मिळू शकतो.
1 / 5
हळद : हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात, हळदीला आयुर्वेदामध्ये देखील अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्या व्यक्तींना अस्थामा आहे, अशा व्यक्तींनी थंडीमध्ये रोज हळदीचे दूध पिले तर त्यांना आराम मिळू शकतो.
2 / 5
योग : योग हा तसा सर्वच आजारांवरील सर्वोत्तम उपया आहे. मात्र जर अस्थमा असलेली व्यक्ती नित्यनियमाने योग करत असेल तर रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. तसेच योगामध्ये असे अनेक असने आहेत, की ज्यामुळे श्वसनाशी संबंधित समस्या दूर होतात. अस्थमा असलेल्या व्यक्तीने मात्र एक नेहमी लक्षात ठेवावे की, योगा करत असताना प्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. व त्यानुसारच योगासने करावीत.
3 / 5
लसून : लसून हा मुळात उष्ण असतो. त्यामुळे केवळ अस्थमा असलेल्या व्यक्तींसाठीच नाही तर इतर व्यक्तींनी देखील हिवाळ्यात लसनाचे सेवन केले पाहिजे. लसनामुळे सर्दी सारख्या आजारांपासून सुटका मिळते.
4 / 5
मध : थंडीमध्ये सर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मधाचा उपयोग होतो. जर अस्थमा असलेल्या व्यक्तींना सर्दीमध्ये श्वास घेण्यास त्रास होत असेल तर अशा वेळी मधाचे सेवन करणे चांगले मानले जाते. याशिवाय मधामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत.
5 / 5
आले : आल्यामध्ये देखील लसणाप्रमाणेच उष्णता असते. थंडीच्या दिवसात आल्याच्या सेवनाने थंडीपासून होणाऱ्या आजारांपासून आपला बचाव होतो. अनेक लोक दररोज नित्यनियमाने चहात आले टाकतात. आल्याच्या सेवनाने डोके दुखीचा त्रास देखील दूर होतो. टीप वरील सर्व माहिती ही सामान्यज्ञानासाठी आहे. तुम्हाला यातील कुठल्याही पदार्थांचा औषधांसाठी उपयोग करायचा असेल तर त्याआधी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा.