वजन कमी करण्यासाठी ओट्स हा सर्वात पसंतीचा पर्याय आहे. ते प्रथिने समृद्ध आहेत. ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात. ते हृदयरोगाचा धोका कमी करतात.
मोडआलेली कडधान्य स्वादिष्ट तर असताताच पण ती पौष्टिक देखील असतात. मोडआलेली कडधान्य (स्प्राउट्स) व्हिटॉमिन अ, बी 2, सी, डी आणि ई ने समृध्द असतात.
बदाम आणि बिया खाल्लानंतर आपल्याला बराच काळ पोट भरल्यासारखे वाटते. आळशीच्या बियांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे वजन कमी करण्यास मदत करते.
अंडी प्रथिनांचा एक चांगला स्त्रोत मानला जातो, जे वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम पदार्थांपैकी एक आहे. तुम्ही अंडी वेगवेगळ्या प्रकारे खावू शकता. त्यामध्ये उकडलेली किंवा तळलेली अंडी तुम्ही खावू शकता.
चीजमध्ये माठ्या प्रमाणात प्रथिने असतात. चीज प्रथिनांचे प्रमाण वाढवण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. त्यात कॅलरीज कमी असतात. चीज खाल्ल्यानंतर बराच काळासाठी तुमचे पोट भरलेले राहते.