ढगफुटीसदृश्य पावसामुळे मुले शाळेत अडकली, पाण्याबरोबर साप-विंचू शाळेत…एका जवानास सापाने चावाही घेतला…

| Updated on: Jul 19, 2024 | 11:23 AM

Maharashtra Rain: विदर्भात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. गडचिरोली जिल्ह्यास पावसाचा रेड अलर्ट गुरुवारी दिला होता. त्यानंतर शुक्रवारीही पावसाचा रेड अलर्ट आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सूर्यापल्ली गावात व मॉडेल शाळेत तलावाचे पाणी शिरल्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. विद्यार्थी शाळेतच अडकले होते. रेस्क्यू करुन मध्यरात्री विद्यार्थ्यांना शाळेतून बाहेर काढले.

1 / 5
गडचिरोलीमधील सिरोंचा तालुका नेताजी सुभाषचंद्र बोस आवसिया विद्यालय मुलांचे निवासी वसतीगृह आहे. या ठिकाणी १२० मुले राहतात. गुरुवारी या ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. त्यामुळे खालच्या मजल्यावर पाणी घुसले.

2 / 5
शाळेच्या वसतीगृहात पाणी आल्यानंतर पाण्याबरोबर साप, विंचू आले. एका जवानास बिवविषारी सापाने चावाही घेतला. मुलांच्या खोलीपर्यंत पाणी घुसल्यामुळे मुले वरच्या मजल्यावर गेली. त्यामुळे त्यांचा धोका टळला. त्या दरम्यान प्रशासनाकडून मुलांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु झाले.

3 / 5
सिरोंचा तालुक्यातील रामजापूर येथील मॉडेल शाळेत तीन ते चार फूट पाणी शिरल्यानंतर तहसीलदार, पोलीस निरीक्षकच्या टीमने जवळपास 120 विद्यार्थ्यांना पुराच्या पाण्यातून सुरक्षित बाहेर काढले. गुरुवारी रात्री दोन वाजेपर्यंत हे रेस्क्यू ऑपरेशन सुरु होते.

4 / 5
सिरोंचा तालुक्यात चार तास ढगफुटी सदृश्य पाणी आले. यामुळे वसतीगृहातून कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयामध्ये या विद्यार्थ्यांना सुरक्षित हलविण्यात आले. त्यानंतर प्रशासन अन् पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

5 / 5
सिरोंचा तालुक्यापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या सुर्यापल्ली गावात घरांमध्ये तलावाचे पाणी शिरले. यामुळे या ठिकाणी ग्रामस्थांचे खूप मोठे नुकसान झाले. घरातील धान्याचेही नुकसान झाले आहे.