राज्यात अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. दोन दिवस सुरू असलेल्या पावसाने 373 वर्षांनी अक्कलकोट जूना राजवाड्याचा ऐतिहासिक दुर्बिण बुरुज ढासळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पावसामुळे 373 वर्षांनी अक्कलकोट जुना राजवाड्याचा ऐतिहासिक दुर्बिण बुरुज कोसळला आहे.
छत्रपती शाहू महाराज (संभाजी राजे यांचे पुत्र) यांनी अक्कलकोट संस्थानची निर्मिती केली होती.
रात्रीपासून शहर आणि जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण गावात पाणी शिरलं असून जनजीवन विस्कळीत झालं आहे.
कोल्हापुरातही पुन्हा दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. पहाटेपासूनच ढगाळ वातावरण होतं. मात्र, आता पावसाची जोरदार बॅटिंग सुरू झाली आहे.
लातूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही पावसाची रिपरिप सुरुच आहे. ढगाळ वातावरण आणि गारठा पसरला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं आहे.