Heeramandi: ‘या’ 5 कारणांसाठी पहा भन्साळींची ‘हिरामंडी’ वेब सीरिज

| Updated on: Apr 30, 2024 | 4:58 PM

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भन्साळींनी सेटसाठी किती मेहनत घेतली, याविषयी सांगितलं. जवळपास 60 हजार लाकडी फळ्या आणि धातूच्या फ्रेम्सने सेट उभारण्यासाठी 700 कारागिरांच्या टीमने मुंबईच्या फिल्म सिटीमध्ये सात महिने काम केलं होतं.

1 / 6
संजय लीला भन्साळींची बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'हिरामंडी' ही वेब सीरिज 1 मे रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भन्साळी गेल्या 10 वर्षांहून अधिक काळापासून या ड्रीम प्रोजेक्टवर काम करत आहेत. या सीरिजच्या ट्रेलरने, गाण्यांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. ही सीरिज का पाहिली पाहिजे, यासाठीची खास पाच कारणं जाणून घेऊयात..

2 / 6
संजय लीला भन्साळी हे 'लार्जर दॅन लाइफ' चित्रपटांसाठी ओळखले जातात. त्यांच्या चित्रपटात जी भव्यता, जी श्रीमंती दिसते, ती दुसऱ्या कोणत्याच भारतीय दिग्दर्शकांच्या चित्रपटांमध्ये सहसा पहायला मिळत नाही. याच भव्यदिव्यतेनं 'हिरामंडी'ची प्रत्येक फ्रेम सजली आहे. भव्य सेट उभारण्यामागे जी मेहनत घेतली गेली, त्याचे बारकावे या सीरिजमध्ये पहायला मिळतील.

3 / 6
संजय लीला भन्साळी हे त्यांच्या कल्पक बुद्धिसोबतच संगीताप्रती असलेल्या विशेष प्रेमासाठीही ओळखले जातात. 'हिरामंडी'मधील तीन गाणी आतापर्यंत प्रदर्शित झाली आहेत. या तिन्ही गाण्यांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

4 / 6
‘हिरामंडी’ची कथा अत्यंत रंजक आहे. हिरामंडी हा पाकिस्तानमधील लाहोर स्थित रेडलाइट एरिया आहे. एकेकाळी तो ‘शाही मोहल्ला’ म्हणून ओळखला जायचा. देशाच्या विभाजनापूर्वी ‘हिरामंडी’च्या वेश्या त्याकाळी प्रचंड चर्चेत होत्या. राजकारण, प्रेम आणि फसवणूक या सर्व गोष्टी त्याकाळी कोठ्यावर पहायला मिळायच्या. त्यामुळे या सीरिजची कथा प्रेक्षकांसाठी फार रंजक असेल.

5 / 6
'हिरामंडी'मधील प्रत्येक महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी भन्साळींनी अत्यंत विचारपूर्वक कलाकारांची निवड केली आहे. या सीरिजमध्ये अभिनेता फरदीन खान तब्बल 14 वर्षांनंतर पुनरागमन करतोय. याशिवाय अध्ययन सुमन, शेखर सुमन, मनिषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, संजीदा शेख यांच्याही भूमिका आहेत.

6 / 6
संजय लीला भन्साळी हे सर्वोत्कृष्ट चित्रपटांसाठी ओळखले जातात. त्याच्या चित्रपटातील प्रत्येक दृश्यात कलेचा उत्कृष्ट नमुना पहायला मिळतो. त्यामुळे ‘हिरामंडी’मध्येही त्यांच्या कामाची एक वेगळी बाजू पहायला मिळेल, यात काही शंका नाही. भन्साळींच्या दिग्दर्शनासाठी ही सीरिज आवर्जून पहायला हवी.