कांजीवरम साडी, मोकळे केस सोडून पीक कापणीची ॲक्टिंग; हेमा मालिनी ट्रोल
हेमा मालिनी यांनी अशाप्रकारे शेतात जाऊन फोटो काढण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. 2019 मध्येही त्यांनी शेतात पीक कापणी करतानाचे फोटो काढले होते. तेव्हासुद्धा हेमा मालिनी यांना ट्रोल करण्यात आलं होतं.
1 / 5
बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेत्री आणि मथुरेच्या खासदार हेमा मालिनी यांनी सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये त्या शेतात पीक कापणी करताना दिसत आहेत. कांजीवरम साडी नेसून गव्हाची पीक कापणी करतानाचे त्यांचे फोटो पाहून काही नेटकरी चांगलेच भडकले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा केवळ पब्लिसिटी स्टंट आहे, अशी टीका नेटकरी करत आहेत.
2 / 5
हेमा मालिनी यांनी सोशल मीडियावर चार विविध फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये त्या पीक कापणी करताना, कापणी केलेल्या पिकासोबत फोटोसाठी पोझ देताना आणि शेतमजूर महिलांसोबत उभं राहून फोटो काढताना दिसत आहेत.
3 / 5
या फोटोंच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, 'आज मी त्या शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी त्यांच्या शेतात गेली, ज्यांना मी गेल्या दहा वर्षांपासून नियमित भेटतेय. मला भेटून ते खूप खुश झाले आणि त्यांनी मला फोटोसाठी पोझसुद्धा देण्याची विनंती केली. त्यामुळे मी हे फोटो काढले.'
4 / 5
या फोटोंवरून हेमा मालिनी यांना खूप ट्रोल केलं जातंय. 'एप्रिल महिन्यात कांजीवरम सिल्क साडी नेसून, केस मोकळे सोडून असा पीआर स्टंट करणं कितपत योग्य आहे? तुम्ही तुमची पीआर एजन्सी बरखास्त केली पाहिजे', असं एकाने लिहिलं. तर 'काय टाईमपास आहे हा. थोडीतरी लाज बाळगा', असं दुसऱ्याने म्हटलंय.
5 / 5
'खासदार म्हणजे शेतात उभं राहून फक्त फोटो काढणं नाही. शेतकऱ्यांची खिल्ली उडवू नका. लोकांनी तुम्हाला मतं का द्यायला हवीत? मथुरेसाठी तुम्ही असं काय केलंय', असा सवाल नेटकऱ्यांनी हेमा मालिनी यांना केला आहे.