जास्वदांच्या फुलांचा त्वचेसाठी करा ‘असा’ वापर, चेहऱ्यावर येईल नैसर्गिक चमक!
जास्वदांचं फुल हे पूजेसाठी वापरले जातं. हे फुल केसांसाठी आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. जास्वदांमध्ये अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात ते त्वचेचे संरक्षण करतात. जास्वदांचे फेसपॅक त्वचेला लावल्याने त्वचा चमकदार होते. कुठले फेसपॅक आहेत हे? हे फेसपॅक कसे तयार करायचे? बघुयात...
1 / 5
जास्वंदापासून तुम्ही खूप प्रकारचे फेसपॅक तयार करू शकता. या फेसपॅकमुळे त्वचेवरील डाग दूर होतात. उन्हापासून त्वचेचं नुकसान होत नाही. पण बऱ्याच लोकांना जास्वदाचं फेसपॅक कसं बनवायचं? त्याची प्रोसेस कशी आहे हे कळत नाही. चला तर मग बघुयात...
2 / 5
साधा फेसपॅक: २ चमचे जास्वंदाच्या फुलांची पावडर घ्या, त्यात पाणी टाकून पेस्ट तयार करा. हा फेसपॅक तुम्ही आठवड्यातून २ ते ३ वेळा लावू शकता. हा फेसपॅक चेहऱ्याला आणि मानेला लावा. २० मिनिटे लावून ठेवल्यानंतर चेहरा धुवून टाका तुम्हाला फरक जाणवेल.
3 / 5
जास्वंद आणि कच्चे दूध: २ चमचे जास्वंदाच्या फुलाची पावडर घ्या आणि त्यात कच्चे दूध घाला. हे मिक्स करून याची पेस्ट तयार करा. हा फेसपॅक त्वचेवर १० मिनिटे लावून ठेवा. यानंतर साध्या पाण्याने त्वचा स्वच्छ करा. हा फेसपॅक तुम्ही आठवड्यातून 2 किंवा 3 वेळा वापरू शकता.
4 / 5
जास्वंदाचं फुल आणि ग्रीन टी: जास्वंदाची फुले काही दिवस सुकायला ठेवा. सुकल्यानंतर त्याची पावडर बनवा. आता या पावडरमध्ये २ चमचे ग्रीन टी घाला. ग्रीन टी बनवून ती थंड करून तुम्ही ती पावडरमध्ये टाकू शकता. त्याचा फेसपॅक बनवा आणि तो चेहऱ्याला लावा. हा फेसपॅक २० मिनिटे लावा. या फेसपॅकने डाग दूर होतील.
5 / 5
जास्वंद आणि कोरफड जेलचे फेसपॅक त्वचेला मॉइश्चरायझ करते. २ चमचे जास्वंद पावडर आणि त्यात कोरफड जेल. हा फेसपॅक १५ मिनिटे चेहऱ्याला लावा तुम्हाला फरक दिसेल. आठवड्यातून दोनदा हा फेसपॅक लावता येईल.