Marathi News Photo gallery Hina khan reacts on rajan shahi claim having insecure of shivangi joshi yeh rishta kya kehlata hai
वडिलांना दिलेल्या वचनामुळे मी गप्प..; ‘ये रिश्ता..’च्या निर्मात्यांसोबतच्या वादावर काय म्हणाली हिना?
'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेत अभिनेत्री हिना खानने सहा वर्षे अक्षराची भूमिका साकारली होती. मालिका सोडताना तिचा निर्मात्यांसोबत वाद झाला होता. निर्मात्यांच्या आरोपांवर तिने आता प्रतिक्रिया दिली आहे.
1 / 7
अभिनेत्री हिना खान 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून घराघरात पोहोचली. ही तिच्या करिअरमधील पहिलीची मालिका होती. मात्र सहा वर्षांनंतर तिने त्यातून काढता पाय घेतला होता. मालिका सोडताना हिनाचा निर्माते राजन शाही यांच्यासोबत वाद झाला होता.
2 / 7
काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत राजन शाही यांनी हिनाचं मालिका सोडण्यामागचं कारण सांगितलं होतं. "मालिकेत आलेल्या लीपमुळे हिना खुश नव्हती. म्हणून ती सतत स्क्रीप्टमध्ये हस्तक्षेप करत होती. इतकंच नव्हे तर शिवांगी जोशीचं महत्त्व वाढवणारे डायलॉग्स बोलण्यास तिने नकार दिला होता", असं ते म्हणाले होते.
3 / 7
"मी तिला बजावलं होतं की जे सीन्स जसे आहेत, तुला तसेच शूट करावे लागतील. त्याला तिने स्पष्ट नकार दिला. तेव्हा मी सुनावलं की शूट पूर्ण कर किंवा सेटवरून निघून जा. त्यादिवशी ती पूर्ण दिवस मेकअप रुममध्ये बसली होती. रात्री जेव्हा ती सेटवरून गेली, तेव्हा तिला मेसेज करण्यात आला की तिला यापुढे सेटवर यायची गरज नाही. तिचा करार रद्द करण्यात आला आहे", अशी बाजू राजन शाही यांनी सांगितली होती.
4 / 7
राजन शाही यांच्या आरोपांवर आता हिना खानने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत उत्तर दिलं आहे. "मी कधीच कोणाविषयी वाईट बोलत नाही. माझ्या मनात राजन शाही यांच्याबद्दल खूप आदर आहे. ते माझ्याबद्दल असं का म्हणाले माहीत नाही. त्यांनी मला करिअरमधील पहिली संधी दिली होती", असं हिना म्हणाली.
5 / 7
याविषयी तिने पुढे सांगितलं, "मी जेव्हा 'ये रिश्ता..' ही मालिका सोडली, तेव्हा माझे वडील खूप निराश होते. इतकी वर्षे काम केल्यानंतर मालिका सोडताना काही गोष्टी सकारात्मकदृष्ट्या संपल्या नाहीत. वडिलांनी माझ्याकडून वचन मागितलं होतं की, मी कधीच त्या मालिकेविषयी वाईट बोलणार नाही."
6 / 7
"मी त्या मालिकेविषयी आणि त्याच्याशी जोडलेल्या कोणत्याच व्यक्तीविषयी मी कधीच काही बोलू नये, असं त्यांनी वचन मागितलं होतं. तेव्हापासून मी त्याच वचनावर कायम आहे. आता माझे वडील आयुष्यात नाहीत, तर मी हे वचन कसं तोडू शकते", असं हिना पुढे म्हणाली.
7 / 7
अखेर तिने असं स्पष्ट केलं, "हे गरजेचं नाही जे लोक जास्त बोलतात, ते नेहमीच खरे असतात. त्याचप्रमाणे हेसुद्धा गरजेचं नाही की जे लोक कमी बोलतात, ते चुकीचे असतात."