Ratan Tata Friendship Story: पुणेकर 20 वर्षांचा शांतनू कसा बनला रतन टाटा यांचा बेस्ट फ्रेंड?

| Updated on: Oct 13, 2024 | 11:32 AM

Ratan Tata Friendship Story: भारताचे दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांचे 9 ऑक्टोंबर 2024 निधन झाले. सर्वसामान्यांच्या मनावर राज्य करणारे रतन टाटा यांच्या निधनानंतर संपूर्ण देश शोकसागरात बुडला. रतन टाटा यांच्या अंतिमसंस्कारला देशातील दिग्गजांची उपस्थिती होती. तसेच सर्वसामान्यांनी रतन टाटा यांची अंतिम दर्शनासाठी गर्दी केली होती. रतन टाटा यांच्या अंतिम संस्कारात त्यांचा युवा मित्र शांतनू नायडू मोटारसायकलवर सर्वात पुढे जात होता.

1 / 5
शांतनू यांनी लिंक्डइनवर रतन टाटा यांच्यासंदर्भात एक इमोशन पोस्‍ट शेअर केली. रतन टाटा यांची वयाच्या 20 वर्ष वयाच्या शांतनू नायडूशी कशी मैत्री झाली? शांतनू यांनी लिहिले, " या मैत्रीने माझ्यात पोकळी निर्माण केली आहे. ती पोकळी भरून काढण्यासाठी मी माझे उर्वरित आयुष्य घालवणार आहे. प्रेमासाठी दुःखाची किंमत चुकवावी लागते. गुडबाय, माय डिअर लाइटहाउस." या भावनांसोबत शांतनू यानी रतन टाटा यांच्यासोबतचा स्वतःचा एक जुना फोटोही शेअर केला आहे.

2 / 5
शांतनू नायडू याचा जन्म १९९३ मध्ये पुण्यात झाला. त्याने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्याने एमबीए केले. तो लेखकसुद्धा आहे. शांतनू याने अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठातून एमबीएचे शिक्षण घेतले आहे. त्याने त्याच्या करियरची सुरुवात टाटा एलेक्सीमध्ये ऑटोमोबाइल डिजाइन इंजीनियर म्हणून केली. जून 2017 पासून तो टाटा ट्रस्टमध्ये काम करत आहे. तो रतन टाटा यांचा असिस्टेंट होता.

3 / 5
नायडू यांच्या प्रतिभेचा रतन टाटा यांच्यावर चांगला प्रभाव होता. त्यामुळेच रतन टाटा यांनी त्यांना फोन करुन स्वत: असिस्टेंट बनण्याची दिली. त्यानंतर 2022 मध्ये रतन टाटा यांच्या कार्यालयात जीएम बनला. शांतून  रतन टाटा यांना स्टार्टअप्समध्ये गुंतवणुकीचा सल्लाही देत होतो.

4 / 5
प्राण्यांवर असलेले प्रेम हे रतन टाटा आणि शांतनू नायडू यांच्या मैत्रीला जोडणारा कॉमन धागा होता. 2014 मध्ये या दोघांची भेट झाली होती. भटक्या कुत्र्यांना अपघातापासून वाचवण्यासाठी नायडू यांनी रिफ्लेक्टिव्ह कॉलर बनवले होते. ते कॉलर भटक्या कुत्र्यांच्या गळ्यात घालत होता. त्यामुळे ड्रायव्हरला अंधारातही ते रिफ्लेक्टिव्ह कॉलर दिसत होते. त्यामुळे वाहन चालक वाहन थांबवत असे अन् कुत्र्यांचे अपघात टळत होते.

5 / 5
दोघांची भेट झाली तेव्हा शांतनू फक्त 20 वर्षांचा होता. नोकरीव्यतिरिक्त शंतनू नायडू यांचा स्वत:चा गुडफेलो नावाचा स्टार्टअप आहे. ही कंपनी ज्येष्ठ नागरिकांना सर्वसमावेशक सहाय्य पुरवते. या कंपनीची किंमत सुमारे पाच कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.