Marathi News Photo gallery How does rekha earns a living despite being away from films in last 10 years what is her source of income
दहा वर्षांपासून चित्रपटांपासून दूर; तरी रेखा कुठून करतात कमाई?
बॉलिवूडच्या सदाबहार अभिनेत्री रेखा या गेल्या काही वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून लांब आहेत. मात्र तरीसुद्धा त्यांची कमाई कुठून होते, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. रेखा यांनी त्यांच्या करिअरमध्ये १०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलंय.
1 / 7
बॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री रेखा यांना वेगळ्या कोणत्याच परिचयाची गरज नाही. लहानपणी अनेक समस्यांचा सामना केलेल्या रेखा यांनी कमी वयातच अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. त्यांचं हिरोइन बनण्याचं स्वप्न नव्हतं, मात्र परिस्थितीमुळे त्या अभिनयक्षेत्रात पोहोचल्या.
2 / 7
तरीसुद्धा आपल्या दमदार अदाकारीच्या जोरावर त्यांनी इंडस्ट्रीत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. आज वयाच्या 69 व्या वर्षीही त्या सौंदर्याच्या बाबतीत तरुण अभिनेत्रींनाही मात देतात. रेखा यांचं खरं नाव भानुरेखा गणेशन असं आहे. त्यांनी करिअरमध्ये आतापर्यंत 180 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलंय.
3 / 7
मात्र गेल्या दहा वर्षांपासून त्या मोठ्या पडद्यापासून दूर आहेत. इतक्या वर्षांपासून काम न करताही रेखा यांची कमाई कुठून होते, असा प्रश्न अनेकांना पडतो. गुगलपासून कोरापर्यंत अनेकांनी याबद्दल प्रश्न विचारला आहे.
4 / 7
रेखा यांची मुंबईपासून दक्षिण भारतापर्यंत बरीच प्रॉपर्टी आहे. त्यापैकी काही त्यांनी भाड्याने दिले आहेत. या प्रॉपर्टीतून रेखा यांना लाखोंचं भाडं येतं.
5 / 7
रेखा या मुंबईतल्या बँडस्टँड परिसरात राहतात. त्यांच्या एका बाजूला शाहरुख खानचा 'मन्नत' बंगला आहे तर दुसरीकडे सलमान खानचं 'गॅलेक्सी अपार्टमेंट्स' आहे. रेखा यांच्या या बंगल्याची किंमत जवळपास 100 कोटी रुपये इतकी आहे. या बंगल्याचं नाव 'बसेरा' असं आहे.
6 / 7
रेखा यांची ब्रँड एंडोर्समेंटच्या (जाहिराती) माध्यमातूनही चांगली कमाई होते. त्यांनी काही मालिकांचंही प्रमोशन केलंय. यासाठी त्यांना तगडं मानधन दिलं जातं. काही रिपोर्ट्सनुसार, बिलबोर्ड्सवर रेखा यांच्या फोटोचा वापर केला, तर त्यासाठी त्यांना दहा ते बारा लाख रुपये मिळतात.
7 / 7
'मसाला डॉट कॉम'ने दिलेल्या वृत्तानुसार, रेखा यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की त्यांनी एफडीमध्ये काही रक्कम गुंतवली आहे. करिअरच्या शिखरावर असताना पैशांची उधळपट्टी करण्याऐवजी त्यांनी एफडीमध्ये ते गुंतवले होते.