जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. पहलगामच्या चंदनवाडीमध्ये आयटीबीच्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली असून या अपघातात सहा जवान शहीद झाले आहेत. तर अनेक जखमी झाले आहेत. बचाव आणि मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. घटनास्थळी 19 रुग्णवाहिका तैनात आहेत.
हाती आलेल्या माहितीनुसार एक बस आयटीबीपीच्या जवानांना चंदनवाडीहून पहलगामला घेऊन जात होती. ब्रेक फेल झाल्याने बस खड्ड्यात पडली. बसमध्ये 39 जवान होते. 37 जवान आयटीबीपीचे होते आणि दोन जवान जम्मू-काश्मीर पोलिसांचे होते.
प्रवासा दरम्यान, ब्रेक फेल झाल्याने बस नदीत पडली. अपघात एवढा भयानक होता की घटनेत बसचा अगदी चक्काचूर झाला आहे. बसचीस्थिती पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.
अपघातात शहीद झालेले व जखमी झालेले सर्व जवान अमरनाथ यात्रेच्या ड्युटीवर असल्याची माहितीसमोर आली आहे . अमरनाथ यात्रा संपल्यानंतर जवान परतत होते.
अपघाताची माहिती मिळताच बचाव कार्यास सुरुवात करण्यात आली आहे. जवानांना तातडीने श्रीनगरच्या लष्करी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.घ टनास्थळी 19 रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक व तसेच लष्कराच्या मदतीने जवानांना बसमधून बाहेर काढत तातडीने रुग्णालयात कसे पोहचवत येईल यासाठी प्रयत्न सुरु आहेत.