ताडोबात ५५ वाघोबा, प्राणी गणनेत सर्वाधिक संख्या कोणत्या प्राण्यांची
tadoba andhari tiger reserve park Animal count: चंद्रपूरमधील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात बुद्ध पोर्णिमेला प्राण्याची गणना झाली. बुद्ध पौर्णिमेला चंद्राच्या लख्ख प्रकाशात झालेल्या प्राणी गणनेत एकूण १ हजार ९१७ वन्यप्राण्यांची नोंद करण्यात आली. दरवर्षी बुद्ध पोर्णिमेला प्राणी गणना करण्यात येते.
1 / 7
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात बुद्ध पौर्णिमेला घेण्यात आलेल्या निसर्गानुभव या नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत कोर आणि बफर क्षेत्रात ५ हजार ६९ मांसभक्षी व तृणभक्षी वन्यप्राण्यांची नोंद करण्यात आली. चंद्रपूर, मूल, मोहर्ली, खडसंगी, पळसगाव व शिवणी या सहा वनपरिक्षेत्रातील गणना झाली.
2 / 7
गणनेत ५५ वाघ व १७ बिबटे असल्याची नोंद झाली. तसेच ४०३ चितळ, ३४४ रानगवे, ३६३ रान डुक्कर, ३४० वानर असे वन्यप्राण्यांची नोंद घेण्यात आली. या उपक्रमात १६० निसर्गप्रेमीं व ८० गाईड सहभागी झाले होते.
3 / 7
प्राणी गणना करण्यासाठी ताडोबा बफर क्षेत्रातील ७९ मचाण उभारण्यात आले होते. त्या ठिकाणी प्रत्येकी दोन निसर्गप्रेमींना संधी दिली होती. वन अधिकारी व क्षेत्रीय वन कर्मचाऱ्यांनी प्राणी गणना केली.
4 / 7
मचाणींवर १६० निसर्गप्रेमींनी क्षेत्रीय वन कर्मचाऱ्यांसोबत बसून प्राणी गणना केली. निसर्गप्रेमींसाठी ‘माय ताडोबा’ या संकेतस्थळावर निसर्ग अनुभव उपक्रमासाठी नोंदणी करण्यात आली होती.
5 / 7
तलावाशेजारी असलेल्या तसेच पानवठ्याच्या शेजारच्या मचाणावर बसून निसर्गप्रेमींना पाणी पिण्यासाठी आलेल्या वाघ व बिबट्याचे मनसोक्त दर्शन घेण्याचा अनुभव याचि देही याचि डोळा आला.
6 / 7
ताडोबामधील दोन्ही झोनमध्ये मोरांची संख्या 327 आढळून आली आहे. यात कोअरमध्ये 230 तर बफरमध्ये 97 मोर आहेत. पंखांचा पिसारा फुलवलेले मोर पाहून अनेकांचा आनंद गगणात मावेनासा झाला.
7 / 7
खडसंगी वन परिक्षेत्रमध्ये सर्वाधिक ५११ वन्य प्राण्यांच्या नोंदी घेतल्या गेल्या. त्यानंतर मोहुरली ४८१, मुल ३४१, शिवणी २१६, पळसगाव १२२, चंद्रपूर १४६ वन्य प्राणी नोंद घेण्यात आली.