जामनगरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये अवघं बॉलिवूड अवतरलं होतं. या कार्यक्रमात शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान यांनी स्टेजवर एकत्र डान्स केला. यावेळी साऊथ सुपरस्टार रामचरणनेसुद्धा त्यांच्यासोबत ठेका धरला होता.
बॉलिवूडचे तिन्ही खान आणि राम चरण तेजा यांनी स्टेजवर परफॉर्म करण्यासाठी अंबानींकडून तगडी रक्कम स्वीकारली होती, अशी चर्चा सुरू आहे. या चर्चांमागील सत्य आता समोर आलं आहे.
शाहरुख, सलमान आणि आमिरला एकत्र स्टेजवर आणण्याचा निर्णय ऐनवेळी घेण्यात आला होता. यासाठी तिघांपैकी कोणीच पैसे घेतलं नसल्याचं कार्यक्रमाच्या सूत्रांनी सांगितलं. तिन्ही खानसोबत स्टेजवर एकत्र नाचण्यासाठी रामचरण तेजानेही काहीच पैसे घेतले नव्हते.
बॉलिवूडमधल्या कलाकारांनी जरी अंबानींच्या कार्यक्रमासाठी मानधन स्वीकारलं नसलं तरी आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी जबरदस्त पैसे घेतले आहेत. जगप्रसिद्ध पॉप गायिका रिहानाने अंबानींच्या कार्यक्रमात परफॉर्म करण्यासाठी तब्बल 75 कोटी रुपये घेतल्याचं कळतंय.
गुजरातमधील जामनगर याठिकाणी अत्यंत भव्य स्वरुपात हा प्री-वेडिंग कार्यक्रम पार पडला. तीन दिवसांच्या या कार्यक्रमाला देश-विदेशातून सेलिब्रिटी अवतरले होते.