Miss World : ‘मिस वर्ल्ड’च्या मुकूटाची किंमत किती? कोणी डिझाइन केला हा खास मुकूट?
जी महिला 'मिस वर्ल्ड'चा किताब जिंकते, तिला त्या मुकूटाची एक प्रतिकृतीसुद्धा देण्यात येते. आपल्याकडे ती आठवण जपून ठेवता यावी, म्हणून तिला ती प्रतिकृती दिली जाते.
1 / 5
'मिस वर्ल्ड' या प्रतिष्ठित सौंदर्यस्पर्धेत दरवर्षी विविध देशांतील प्रतिभावान आणि सुंदर महिला भाग घेतात. प्रसिद्धी आणि लोकप्रियतेसोबतच या स्पर्धेच्या विजेत्यांना इतरही बक्षीसं मिळतात. त्यापैकीच सर्वांत महत्त्वाचं म्हणजे मिस वर्ल्डचा मुकूट. या मुकूटाची किंमत काय, तो कोणी डिझाइन केला याविषयी जाणून घेऊयात..
2 / 5
'मिस वर्ल्ड'चा मुकूट मिकिमोटो या जपानी कंपनीने डिझाइन केला आहे. ही कंपनी कल्चर्ड पर्ल्ससाठी विशेष ओळखली जाते. हा मुकूट निळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या हिऱ्यांनी बनवलेला आहे. दरवर्षी बदलणाऱ्या विजेतीच्या डोक्यावर हा मुकूट फिट बसण्यासाठी त्याला डिटॅचेबल बेससुद्धा आहे.
3 / 5
आताचा मिस वर्ल्डचा मुकूट हा 2017 मध्ये डिझाइन करण्यात आला होता. या सौंदर्यस्पर्धेच्या इतिहासातील हा चौथा मुकूट आहे. याआधीचेही मुकूट मिकिमोटो या कंपनीनेच डिझाइन केले होते. मात्र आधीच्या मुकूटांचे डिझाइन्स आणि रंग वेगळे होते.
4 / 5
मिस वर्ल्डचा पहिला मुकूट 1951 ते 1973 पर्यंत वापरण्यात आला होता. मोती आणि डायमंडपासून बनवलेला हा सर्वसामान्य टियारा होता. दुसरा मुकूट 1974 ते 2000 पर्यंत वापरण्यात आला. हा आकाराने थोडा मोठा होता. तिसरा मुकूट 2001 पासून 2016 पर्यंत वापरण्यात आला होता.
5 / 5
मिस वर्ल्डच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार हा मुकूट हा तब्बल 100,000 डॉलर्सचा असल्याचं समजतंय. मात्र हे मुकूट विजेतीच्या मालकीचं कधीच होत नाही. मिस वर्ल्ड या संस्थेकडून विजेतीला वर्षभरापुरता हा मुकूट दिला जातो.