बॉलिवूडचा 'भाईजान' अर्थात अभिनेता सलमान खान दरवर्षी भरभक्कम टॅक्स भरतो. बॉक्स ऑफिसवरील चित्रपटांची कमाई, जाहिराती आणि इतर प्रोजेक्ट्समधून त्याची चांगलीच कमाई होते. यावर्षी तो सर्वाधिक टॅक्स भरणाऱ्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
सलमान खानने यावर्षी तब्बल 75 कोटी रुपये कर भरला आहे. यानुसार सर्वाधिक कर भरणाऱ्या भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत तो तिसऱ्या स्थानी आहे.
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर साऊथ सुपरस्टार थलपती विजय आहे. त्याने या वर्षात 80 कोटी रुपये टॅक्स भरला आहे. थलपती विजय हा तमिळ सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेता आहे.
सर्वाधिक कर भरणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये बॉलिवूडचा 'किंग' अर्थात शाहरुख खान आहे. त्याने यावर्षी तब्बल 92 कोटी टॅक्स भरला आहे. या यादीत 71 कोटी रुपये कर भरणारे अमिताभ बच्चन चौथ्या क्रमांकावर आहेत. तर 42 कोटी रुपये कर भरणारा अजय देवगण पाचव्या स्थानी आहे.
अभिनेता हृतिक रोशनने यावर्षी 28 कोटी रुपये कर भरला आहे. या यादीत तो सातव्या क्रमांकावर आहे. सर्वाधिक कर भरणाऱ्यांच्या यादीत कॉमेडीयन कपिल शर्मासुद्धा आहे. यावर्षी त्याने 26 कोटी रुपये कर भरला आहे.