गॅस सिलिंडर झटपट बुक कसा कराल, जाणून घ्या सोपी प्रक्रिया
LPG GAS | अगदी व्हॉटसएपवरुनही तुम्ही गॅस बुक करु शकता. भारत गॅस, इंडियन ऑईल आणि एचपी गॅसने ग्राहकांना Whatsapp वरून सिलिंडर बुक करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.
-
-
Lpg Gas Cylinder Booking
-
-
पेटीएमच्या या ऑफरनुसार, दररोज 5 लकी ड्रॉ काढले जातील. प्रत्येक विजेत्याला पेटीएमकडून 10,001 रुपयांचे सुवर्ण जिंकण्याची संधी मिळेल. यासह, या ऑफरमध्ये सहभागी होणारे सर्व लोक, जिंको किंवा नको, त्यांना निश्चितपणे 100 रुपयांचे बक्षीस मिळेल. ग्राहकांना फक्त त्यांच्या मोबाईलमध्ये पेटीएम अॅपद्वारे पेमेंट करावे लागते. पेटीएमवरून गॅस बुकिंगची सुविधा उपलब्ध आहे. त्या सुविधेचा फायदा घेत ग्राहकाला 10,001 रुपयांचे सोने जिंकण्याची बंपर ऑफर मिळत आहे.
-
-
याशिवाय, तुम्ही मोबाईवरुन मिस्ड कॉल देऊनही सिलिंडर बुक करु शकता. इंडियन LPG च्या ग्राहकांनी 8454955555, तर BPCLच्या ग्राहकांना 77109555555 आणि HP गॅस एजन्सीला 9493602222 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन गॅस बुक करता येईल.
-
-
एचपी गॅस एजन्सीचे ग्राहक 9222201122 या Whatsapp क्रमांकावरूनही गॅस बुक करु शकतात. नंबर रजिस्टर्ड केल्यानंतर Whatsapp वर ऑर्डर माहिती येईल. यामध्ये गॅस कधी येणार याचा संपूर्ण तपशील असेल.
-
-
LPG Gas Cylinder