PHOTO: फिक्स्ड डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवताना ‘या’ चार गोष्टी नक्की ध्यानात ठेवा
Fixed Deposit | भारतीय गुंतवणूकदारांमध्ये बँकेतील मुदत ठेव योजनांचा (Fixed Deposite Scheme) पर्याय नेहमीच लोकप्रिय राहिला आहे. तुलनेत कमी जोखमीची आणि हमखास परतावा देणारी गुंतवणूक म्हणून फिक्स्ड डिपॉझिटकडे पाहिले जाते. त्यामुळे आजही गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध असूनही सामान्य गुंतवणूकदार फिक्स्ड डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवण्याला प्राधान्य देतात.
आता 3 वर्षांच्या फिक्स्डवर मिळवा 7 टक्के व्याज
Follow us on
फिक्स्ड डिपॉझिटमध्ये तुम्ही अवघ्या सात दिवसांपासून ते दीर्घकालीन गुंतवणूक करु शकता. मात्र, फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करताना काही गोष्टींचे भान बाळगले पाहिजे.
मुदत ठेव योजनांमध्ये पैसे किती कालावधीसाठी गुंतवायचे हे आपल्या गरजेनुसार आणि सोईनुसार ठरवा. तुमच्याकडे जास्त पैसे असतील आणि पुढील पाच-दहा वर्षे या पैशांची फारशी गरज लागणार नाही, असे वाटत असल्यास पैसे FD मध्ये गुंतवा. एक किंवा दोन वर्षांच्या तुलनेत दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास FD वर जास्त व्याज मिळते.
फिक्स्ड डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवताना किती व्याज मिळणार, याची योग्य ती माहिती घ्यावी. सध्या फिक्स्ड डिपॉझिटवर सर्वसाधारणपणे 6 ते 7 टक्के इतके व्याज मिळत आहे. ज्येष्ठ नागरिकांना इतरांच्या तुलनेत 0.25 टक्के अधिक व्याज मिळते. मुदत ठेव योजनेत एकदा पैसे गुंतवले तर ते योजनेचा कालावधी पूर्ण होईपर्यंत काढता येत नाहीत. तुम्हाला मुद्दल रक्कम आणि व्याजाचे पैसे एकत्रच मिळतात. तर नॉन- क्युमिलेटिव्ह मोडमध्ये तुम्हाला मुदत ठेवीचे व्याज प्रत्येक महिन्यालाही मिळू शकते.