तसा तर सुंदरता हा ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनाचा विषय आहे, दृष्टिकोनाशी संबंधित आहे. काहीजण तिळांना सुंदरतेचा भाग मानतात तर काही निर्दोष त्वचेलाच सर्वस्व मानतात. वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या गोष्टींची इच्छा, अपेक्षा, आकांक्षा असते. चेहरा असाच असावा- तसाच असावा असं बरंच काय-काय त्यांना वाटतं. यात काही लोकांना चेहऱ्यावर तीळ नको असतात. जाणून घेऊयात तीळ घालवण्याचे घरगुती उपाय...