रायगड : महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळून तब्बल 43 ग्रामस्थांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण देश हळहळला. मुसळधार पावसामुळे ही दुर्दैवी घटना घडली.
या घटनेला आज (25 जुलै) चार दिवस झाले आहेत. दुर्घटनेनंतर हे संपूर्ण गाव स्मशानामध्ये बदललं आहे. तळीये गाव हे डोंगर कपारीमध्ये वसलेलं आहे. मुसळधार पावसामध्ये दरड कोसळल्यामुळे येथे तब्बल 35 घरं दबली गेली.
मात्र, दरड कोसळण्यापूर्वी हे गाव कसं होतं ? हे सांगणारी काही दृश्ये समोर आली आहेत. डोंगरात वसलेलं तळीये हे गाव पूर्वी निसर्गाने खुलून दिसायचं.
पण दरड कोसळल्यानंतर होत्याचं नव्हतं झालं आणि हे संपूर्ण गाव स्मशानात बदललं. हिरवीगार झाडं, डोंगर, वेगवेगळे पक्षी आणि प्राणी अशा जैविविधतेने हे गाव समृद्ध होते. मात्र, सध्या येथे काहीही शिल्लक राहिलेले नाही. येते घरंच्या घरं मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून नष्ट झाली आहेत. या दुर्घटनेत 43 ग्रामस्थांचा मृत्यू झाला आहे.